मुंबई | Mumbai
राज्याच्या विधीमंडळात आज सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वपक्षीय नेते, आमदार यांच्या उपस्थितीत सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आभार मानले. यावेळी ते म्हणाले, या सत्काराचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे. माझा हा सत्कार महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेने केल्याचे मी समजतो. विधीमंडळाचे आणि माझ्या वडिलांचे ३० वर्षांपासून नाते आहे. याच विधीमंडळाने माझा केलेला सत्कार ‘न भुतो न भविष्यती’ असा आहे, असे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले.
विधीमंडळात आज (दि. ८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. माझ्यासाठी हा सत्कार फार महत्त्वाचा आहे. कारण याच विधिमंडळात माझ्या वडिलांनी अनेक वर्षे लोकप्रतिनिधत्त्व केलेले आहे. त्याच सभागृहात माझा सत्कार होत आहे. ही माझ्यासाठी फार भूषणवाह बाब आहे, असे गवई म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी भारतीय संविधानाबाबत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे भारतीय संविधानविषयक विचार यावर मत व्यक्त केले. संविधान तयार करताना आंबेडकरांचे विचार काय होते? याबाबतही त्यांनी आपले मत व्यक्त केले.
काय म्हणाले सरन्यायाधीश?
“थोरांची जन्मभूमी असलेले संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संज जनाबाई, संत चोखामेळा यांनी महाराष्ट्रात अत्यांतिक लोकशाहीचा पारा रचला. अर्थात स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ केलेले यांनी देशाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व अबाधित राहावे याकरता, ज्यांनी स्वातंत्र्याचा ऐतिहासिक लढा उभारला ते छत्रपती शिवाजी महाराज,ज्याला भारताचे पुनर्जीवन म्हणता येईल ते भारताचे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, जनेतेचे रयतेचे राजा छत्रपती शाहू महाराज, या घटनेच्या निर्मितीमध्ये आणि देशामध्ये सामाजिक, आर्थिक समानता आणण्यात ज्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृीताला मी सर्वप्रथम वंदन करतो”, असे सरन्यायाधीश म्हणाले.
मी भारतीय राज्य घटनेचा विद्यार्थी समजतो
मी नेहमीच भारतीय राज्य घटनेचा विद्यार्थी स्वतःला समजत आलो आहे. राज्य घटना मी १० वी मध्ये असताना माझ्यात मनात रुजली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने राष्ट्रीयत्व असलेले व्यक्ती होते. ते म्हणायचे की मी पहिला आणि शेवटचा भारतीय आहे. आपला देश एकसंघ ठेवायचा असेल, तर वन नेशन वन सिटीझन हे धोरण ठेवायला पाहिजे. फेड्रॅलिजम जर आपण आणतोय तर ते फ्लेक्सिबल असले पाहिजे. म्हणून जेव्हा केव्हा हा देश एकसंघ कसा राहील, यासाठी घटनेत प्रोव्हिजन केले आहे. भारतीय राज्य घटनेचे तीन स्तंभ आहेत. विधिपालिका, न्याय पालिका आणि कायदेपालिका. घटनेत कायद्याचे पालन करण्याची जबाबदारी विधीमंडळाची आहे, असेही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या राज्याचे सुपुत्र असलेले भूषण गवई हे देशाचे सर न्यायाधीश झाले, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा सत्कार करण्याचे ठरवले. दादासाहेब गवई यांचा विधिमंडळाशी वेगळा संबंध होता. समाजातील प्रत्येक व्यक्तीला दादा साहेब यांच्याकडे जाता येत होते. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यामध्ये साधेपणा आहे. मानवता आणि संवेदनशीलता हा त्यांच्या स्वभावातील गुण आहे. एखाद्या प्रश्नातून मार्ग कसा काढावा, हे त्यांच्याकडून शिकावे. कधीही त्यांनी सुट्टी घेतल्याचे दिसले नाही. गवई यांची कारकिर्द मी जवळून बघितलेली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी सरन्यायाधीश गवई यांचे तोंडभरून कौतुक केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





