नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
कॉक्रोज जनता पार्टीने आज पुन्हा आंदोलन पुन्हा सुरू केले आहे. पार्टीतील प्रमुख नेते दिल्लीच्या जंतर मंतरवर पोहचले असून तिथे अभिजीत दिपके यांनी पत्रकार परिषद घेऊन काल पोलिसांनी आंदोलक मुलांवर अत्यंत क्रूरपणे हल्ला केला असा आरोप केला. त्यांनी १२ वर्षाच्या मुलींना पुरूष पोलिसांनी मारले असा देखील आरोप केला. पोलिसांनी आंदोलकांवर क्रूरपणे लाठीचार्ज केला. याचबरोबर पोलिसांनी शबाना आझमी सोनम वांगचुक यांची पत्नी गीतांजली यांना घेऊन जाणाऱ्या गाडीवर देखील हल्ला केल्याचा आरोप केला.
मोर्चावर केलेल्या लाठीचार्ज दरम्यान पोलिसांनी कोणतीही तमा बाळगली नाही. आंदोलकांची डोकी, छाती, पाठ मिळेल तिकडे पोलीस बिनधास्तपणे लाठ्या मारताना दिसत होते. या लाठीमारात अनेक आंदोलक जखमी झाले असून त्यापैकी एका तरुणीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, आज पुन्हा एकदा जंतर मंतरवर तरुण जमले आहेत. तरुणांनी पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, आज सीजेपी प्रमुख अभिजीत दीपके यांनी तरुणांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी तरुणांची माफी मागितली.
पोलिसांकडून कथितरित्या मारहाण झालेल्या तरुणांची अभिजीत दिपके यांनी माफी मागितली. “मी आमच्या सर्व समर्थकांची, विशेषतः पुरुष पोलीस अधिकाऱ्यांकडून अमानुषपणे मारहाण झालेल्या मुलींची माफी मागतो. आम्ही आणखी चांगली कामगिरी करू शकलो असतो. दिल्ली पोलिसांच्या या अमानुष कृत्यांपासून तुमचं रक्षण करण्यासाठी मी अधिक प्रयत्न करू शकलो असतो,” असेही अभिजीत दीपके म्हणाले.
यावेळी दीपके यांनी सरकारवर टीका केली. “२० मुलांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या धर्मेंद्र प्रधान यांना वाचवण्यासाठी सरकार अनेक लहान मुलांचे रक्त सांडू इच्छिते. जर तुम्ही जखमी असाल आणि ही पोस्ट पाहत असाल, तर कृपया मला थेट संदेश पाठवा. मला तुमच्याशी वैयक्तिकरित्या बोलायचे आहे आणि माफी मागायची आहे. मी तुम्हा सर्वांसाठी लढत राहीन, असेही दीपके म्हणाले.
PM Modi : दिल्लीत आंदोलन सुरु असतानाच NEET पेपरफुटीवर PM मोदींचं मोठं विधान
कॉक्रोज जनता पार्टीच्या अधिकृत एक्स हँडलवर एक ट्विट केले आहे. त्यात, ‘कॉक्रोज जनता पार्टी संस्थापक अभिजीत दिपके, गीतांजली, अभिनेत्री आणि माजी खासदार शबाना आझमी आणि प्रकाश राज यांना घेऊन जाणाऱ्या ट्रकवर पोलिसांनी अत्यंत निर्दयीपणे हल्ला केला.
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, पोलिसांच्या लाठीमारात एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर राममनोहर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. केंद्र सरकार तरुणांशी इतक्या अमानुषपणे का वागत आहे, असा सवाल अभिजीत दिपके यांनी उपस्थित केला.




