Friday, May 29, 2026
Homeदेश विदेशCockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीवर आणखी एक कारवाई; एक्स, इन्स्टा, नंतर...

Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीवर आणखी एक कारवाई; एक्स, इन्स्टा, नंतर आता ‘या’ माध्यमावर कारवाई

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
गेल्या काही दिवसांमध्ये संपूर्ण सोशल मिडिया आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या अभिजीत दिपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीने अवघ्या देशभरात धुमाकुळ घातला आहे. अभिजित दिपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीने त्यांच्या सोशल मिडिया अकाउंटवर २ कोटींच्या जवळपास फॉलोअर्स जमवले आहे. पण, दोन दिवसांपूर्वी त्यांच्या एक्स अकाऊंटवर कारवाई करण्यात आली होती, त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर आता त्यांच्यावर आणखी एक मोठी कारवाई करण्यात आले आहे.

- Advertisement -

कॉकरोच जनता पार्टीचे अधिकृत संकतेस्थळ बंद केले आहे. या संकेतस्थळावर येऊन कॉकरोच जनता पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी करता येत होती. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये आधी कॉक्रोच जनता पार्टीचे एक्स अकाऊंट आणि नंतर इन्स्टा अकाऊंट बंद करण्यात आले होते. एक्स आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर कॉक्रोच जनता पार्टीला तुफान प्रतिसाद मिळाला होता. अवघ्या काही दिवसांमध्ये या दोन्ही समाज माध्यमांवर कॉक्रोच जनता पार्टीचे लाखो सदस्य झाले होते. मात्र, कॉक्रोच जनता पार्टीचे एक्स अकाऊंट, इन्स्टा आणि आता वेबसाईट बंद झाल्याने त्यांना संबंधित यंत्रणांनी मोठा झटका दिला आहे.

नाशिक टीसीएस अत्याचार प्रकरणी एसआयटीने न्यायालयात पुराव्यांची ‘कुंडली’ मांडली; १५८४ पानांचं दोषारोपपत्र सादर

कॉक्रोच जनता पार्टीचे इन्स्टा आणि ट्विटर अकाऊंट बंद झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी इशारा दिला होता. मात्र, अभिजीत दिपके यांनी आपल्या समर्थकांना ही चूक टाळण्याचा सल्ला दिला होता. तसेच तशी कोणतीही निदर्शने झाल्यास त्याच्याशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. समर्थकांनी घाईघाईने कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नये. ज्यामुळे आपल्या चळवळीवर परिणाम होईल. सरकारला आपण एक चूक करावी, हेच हवं आहे. त्यामुळे आपण तसं करु नये. ही मोठी लढाई आहे आणि आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे, असे अभिजीत दिपके यांनी म्हटले होते.

२ कोटीहून अधिक फॉलोअर्स
शनिवारी, खाते सुरू झाल्याच्या सहाव्या दिवशी, कॉकरोच जनता पार्टीच्या इन्स्टाग्राम खात्याने २१.७ मिलियन फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला. फक्त चौथ्याच दिवशी, या खात्याने फॉलोअर्सच्या बाबतीत भाजप आणि काँग्रेसच्या खात्यांना मागे टाकले. कॉकरोच जनता पार्टीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आतापर्यंत फक्त ७५ पोस्ट टाकण्यात आल्या आहेत, तरीही त्याचे फॉलोअर्स २ कोटी १७ लाखांपेक्षा जास्त झाले आहेत. दीपकच्या अनेक व्हिडिओंना लाखो व्ह्यूज आहेत. इतकेच नाही तर, या अकाऊंटवरून रिपोस्ट केलेल्या पोस्टनाही लाखो व्ह्यूज मिळतात.

ताज्या बातम्या

Crime News : लग्नाच्या आमिषाने कॉलेजसमोरून तरूणीचे अपहरण

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar तालुक्यातील चास येथील कॉलेज परिसरातून एका तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अहिल्यानगर तालुका...