नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
कॉकरोच जनता पार्टीचे सुरु असलेले आंदोलन चांगलेच पेटले आहे. कॉकरोच जनता पार्टीचे (Cockroach Janta Party) मोर्चेकरी आता संसद भवनापासून अवघ्या मीटर अंतरावर येऊन पोहोचले आहे. आंदोलकांनी बॅरिकेड देखील ओलांडले आहेत. पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी आश्रुधुराचा मारा (Tear Gas) करण्यात आला आहे. नेमक्या याच मुद्द्यावरून आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकार आणि सरन्यायाधीशांना (Chief Justice Of India) टोला लगावला आहे. ‘मेलेल्यांना जिवंत केल्याबद्दल सरन्यायाधीशांचं आभार’ अशा शब्दात राऊतांनी टोला लगावला आहे.
मेलेल्यांना जिवंत केल्याबद्दल आभार
नवी दिल्लीमध्ये आज जे आंदोलन सुरू आहे त्याचं श्रेय हे फक्त सरन्यायाधीश सूर्यकांत (Chief Justice Of India Suryakant) यांना जात आहे. त्यांनी देशातील मेलेल्यांना जिवंत केल्याबद्दल आभार, अशा शब्दात संजय राऊतांनी टोला लगावला आहे.
जे पी नड्डांसोबत चर्चेत नेमके काय झालं?
बैठकीनंतर सौरव दास यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत सांगितले की, “आम्ही जवळपास दोन तास प्रतीक्षा केल्यानंतर जे.पी. नड्डा यांची सुमारे दहा मिनिटे भेट घेतली. आमच्या सर्व मागण्या लेखी स्वरूपात त्यांच्याकडे सुपूर्द केल्या असून त्यांनी पुढील चर्चेचे आश्वासन दिले आहे. त्या प्रक्रियेत आम्ही सहभागी आहोत.” त्याच पोस्टमध्ये त्यांनी आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणावर आंदोलकांना ताब्यात घेतल्याच्या बातम्याही समोर येत असल्याचा उल्लेख केला.
सौरव दास यांनी आणखी एका पोस्टमध्ये दावा केला की, “पोलिसांनी अभिजीत दीपके यांना ताब्यात घेतले आहे. आम्ही सर्व खासदारांना आवाहन करतो की त्यांनी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहावे. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात आहे.” या दाव्याबाबत पोलिसांकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.




