Thursday, June 18, 2026
HomeनगरAhilyanagar : सफाई मित्रांसाठी एक खिडकी योजना

Ahilyanagar : सफाई मित्रांसाठी एक खिडकी योजना

जिल्ह्यात स्वच्छता सेवा मोहिम

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यास अनुसरुन दरवर्षीप्रमाणे स्वच्छता ही सेवा मोहिम 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत प्रत्येक ग्रामपंचायतीत राबवण्यात येणार आहे. या वर्षीच्या स्वच्छता ही सेवा मोहिमेसाठी नगर जिल्ह्यात स्वच्छोत्सव ही थीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ 17 सप्टेंबरला प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी व गावस्तरावर परिसर स्वच्छता मोहिम राबवून करण्यात येणार आहे.

- Advertisement -

यासाठी स्वच्छता लक्ष युनिट (अस्वच्छ ठिकाणांची निवड करुन सदर ठिकाणांची मॅपिंग करून साफसफाई करण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणांची संस्था/ प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून अधिका अधिक नागरिकांच्या मार्फत स्वच्छता करण्यात येणार आहे. त्याचसोबत जिल्ह्यात साफसफाई सुरक्षा शिबिरातून सफाई मित्रासाठी एक खिडकी योजना राबविली जाणार आहे. यामध्ये सफाई काम करणार्‍या मित्रांसाठी योजनांच्या अनुषंगाने पात्र लाभार्थ्यांसाठी विविध योजना, त्यांच्या आरोग्याच्या तपासणीसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येणार आहेत.

तसेच तालुका पातळीवर डिग्निटी कॅम्पचे आयोजन करुन, वैयक्तीक लाभाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ सफाई मित्रांना देण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात क्लीन ग्रीन उत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण पूरक व शुन्य कचरा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. स्वच्छ सुजल गाव, कचर्‍यापासून कलाकृती, स्वच्छ स्ट्रीट ़फुड, केंद्र आदी उपक्रम, स्वच्छतेसाठी एक दिवस एक घंटा या उपक्रमात 25 सप्टेंबरला देशव्यापी श्रमदान आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आणि जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले यांनी दिली.

मॉडेल गावांची घोषणा
यावेळी हागणदारीमुक्त अधिक मॉडेल गाव आणि स्वच्छ सुजल गाव अंतर्गत विशेष ग्रामसभेद्वारे घोषित करता येतील. या विशेष ग्रामसभा 17 सप्टेंबर रोजी होणार येणार आहे. या मोहिम कालावधित जास्तीत जास्त गावे हागणदारीमुक्त मॉडेल गाव आणि स्वच्छ सुजल गाव म्हणून घोषित करणार आहे. या सर्व उपक्रमांचे शासन स्तरावरुन सनियंत्रण केले जाणार आहे.

ताज्या बातम्या

५९ वर्षीय भोंदू बाबाकडून तरुणीवर अत्याचार; दोन नराधमांसह सहा महिलांना अटक

0
पुणे | प्रतिनिधी आपण प्रत्यक्ष परमेश्वराचा अवतार असल्याचा बनाव रचून एका ५९ वर्षीय भोंदू बाबाने २६ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात...