Friday, September 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसहाय्यक निबंधक,सहकारी संस्था कार्यालयातील लाचखोर मुख्य लिपिक 'एसीबी'च्या जाळ्यात

सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था कार्यालयातील लाचखोर मुख्य लिपिक ‘एसीबी’च्या जाळ्यात

येवला । प्रतिनिधी Yeola

- Advertisement -

नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाची रणधुमाळी सुरू असतानाच येथील तहसील कार्यालय आवारात आज, गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धडक कारवाई करत सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयातील मुख्य लिपिक सुधीर वाघ याला ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे सहकार विभागात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका तक्रारदाराला सावकारी परवान्याचे (लायसन्स) नूतनीकरण करून घ्यायचे होते. हे काम करून देण्यासाठी मुख्य लिपिक सुधीर वाघ याने ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या पथकाने येवला तहसील कार्यालयाच्या आवारात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताच पथकाने सुधीर वाघ याला रंगेहात ताब्यात घेतले.

पोलीस उपाधीक्षक स्वाती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शरद हेंबाडे, युवराज खांडवी आणि चालक समीर शेख यांच्या पथकाने सदर सापळा कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू होती, त्याच आवारात ही कारवाई झाल्याने उपस्थितांमध्ये मोठी चर्चा रंगली.

ताज्या बातम्या

संभाजी

एमपीएससीविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिव महेंद्र हरपाळकरांच्या तोंडाला फासले काळे

0
मुंबई | Mumbaiमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) गैरकारभारावरुन राज्यातील स्पर्धा परीक्षार्थी आणि विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित पेपरफुटी, परीक्षांमधील गैरप्रकार...