Thursday, June 18, 2026
HomeनाशिकNashik Vidhan Parishad Election : 'बनावट मतपत्रिका' व्हायरल झाली अन् गिते बंधूंनी…;...

Nashik Vidhan Parishad Election : ‘बनावट मतपत्रिका’ व्हायरल झाली अन् गिते बंधूंनी…; ऐन मतदानाच्या दिवशीच महायुतीत खळबळ, नेमकं काय घडलं?

नाशिक | Nashik

नाशिक विधानपरिषद निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) एकूण ६१९ मतदारांपैकी ६१८ मतदारांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या नऊ मतदान केंद्रांवर (Voting Center) जाऊन मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची मुदत संपेपर्यंत म्हणजे सायंकाळी चार वाजेपर्यंत नाशिक विधान परिषदेसाठी ९९.८४ टक्के इतके विक्रमी मतदान झाले आहे. त्यामुळे आता सोमवार (दि.२२) रोजी होणार्‍या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

- Advertisement -

दरम्यान आज (गुरुवारी) सकाळी ऐन मतदानाच्या दिवशी या निवडणुकीचा प्रचार थांबवलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गिते (Gokul Gite) यांच्या नावाने सोशल मीडियावर ‘पंसती क्रमांक एक-गोकुळ गीते’ असा मजकूर असलेली बनावट मतपत्रिका व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली. यानंतर भाजपचे संकटमोचकमंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते व गोकुळ गिते यांना तातडीने स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले. त्यानंतर गिते बंधूंनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली.

हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election : नाशिक विधान परिषदेसाठी ९९.८४ टक्के मतदान; उमेदवारांचे भवितव्य मतपत्रिकेत बंद, निकालाकडे लक्ष

यावेळी गणेश गिते (Ganesh Gite) आणि गोकुळ गिते यांनी माध्यमांसमोर येऊन आम्ही युतीधर्म पळत असून कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये, असा खुलासा केला. तसेच “आम्ही महायुतीचा धर्म पाळत निवडणूक रिंगणातून माघार घेतली होती, प्रचार थांबवला होता आणि कुठेही सक्रिय नव्हतो. मात्र, याचा कोणीतरी गैरफायदा घेत असून ही केवळ आमची बदनामी करण्याची खेळी आहे. यामागे नक्कीच षड्यंत्र आहे, असा दावाही गणेश गिते यांनी केला.

हा तर खोडसाळपणा – गणेश गिते

गणेश गिते म्हणाले की, ज्या दिवशी आम्ही प्रचार थांबवला, तेव्हापासून कोणाशीही संपर्क केलेला नाही. या निवडणुकीशी आमचा थेट संबंध नाही. इगतपुरी भागातील कोणीतरी समाजमाध्यमांवर ही पोस्ट व्हायरल करण्याचा खोडसाळपणा केला आहे. मतदारांनी कोणताही गैरसमज करून न घेता महायुतीच्या अधिकृत उमेदवारालाच मतदान करावे, असेही त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election : सकाळपासून मतदानाला सुरुवात; कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात, महायुतीतर्फे दराडे रिंगणात

लोकांच्या मनात काय हे सांगणे अशक्य -गोकुळ गिते

तर गोकुळ गिते यांनी सांगितले की, व्हायरल होत असलेल्या मतपत्रिकेबाबत आपल्याला पुसटशीही कल्पना नाही. कार्यकर्ता आणि मतदारांचा मोठा आग्रह असतानाही आम्ही महायुतीसाठी प्रचार थांबवला होता. काल केवळ दोन-तीन ठिकाणी मतदान केंद्र प्रतिनिधींना अर्ज दिले होते. परंतु, आता शिवसेना ठाकरे गट, महाविकास आघाडी किंवा मालेगावची मते जर आपल्याला पडली, तर त्यावर आमचे नियंत्रण नाही. लोकांच्या मनात काय आहे, हे आम्ही सांगू शकत नाही. जर याउपरही कोणी मतदान केले, तर आपण काहीच करू शकत नसल्याचे, त्यांनी म्हटले होते.

गितेंची मनधरणी ठरली होती चर्चेचा विषय

या निवडणुकीत भाजपचे गोकुळ गिते आणि प्रसाद हिरे यांची बंडखोरी महायुतीसाठी डोकेदुखी ठरली होती. महायुतीच्या तीन मंत्र्यांनी नाशिकमध्ये ठाण मांडून गोकुळ गिते यांची समजूत काढली होती, ज्यानंतर त्यांनी प्रचार थांबवण्यास संमती दिली. मात्र, तांत्रिक कारणांमुळे मतपत्रिकेवर महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासोबत गोकुळ गिते व प्रसाद हिरे यांची नावे कायम राहिली. यातच, खासदार फोडाफोडीच्या राजकारणामुळे संतप्त झालेल्या शिवसेना (ठाकरे गटाने) शिंदे गटाच्या विरोधातील अपक्ष उमेदवाराला मतदान करण्याची घोषणा केल्यामुळे निवडणूक आधीच चुरशीची झाली होती. त्यातच मतदानाच्या दिवशी सकाळीच ही बनावट मतपत्रिका व्हायरल झाल्याने महायुतीचे नेते अस्वस्थ झाल्याचे बघायला मिळाले. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने गणेश गिते यांच्याशी चर्चा करून त्यांना अधिकृत खुलासा करण्याचे निर्देश दिले.

हे देखील वाचा : Nashik MLC Election : नाशिक विधानपरिषद निवडणुकीसाठी दुपारपर्यंत ‘इतके’ टक्के मतदान; येवल्यात १२ पर्यंत एकाने बजावला हक्क

ताज्या बातम्या

Nashik Crime News : नाशिकरोड जेलमध्ये पाटणकर, लोंढेची दादागिरी; जामिनावर बाहेर...

0
नाशिक | Nashik अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) दाखल असलेल्या 'मकोका' गुन्ह्यातील एका संशयिताने (Suspected) जेलच्या बरैकमध्येच दुसऱ्या सहसंशयितास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार...