Sunday, June 21, 2026
Homeब्रेकिंग न्यूजCM Devendra Fadnavis: "कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल…"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपिचंद पडळरांना...

CM Devendra Fadnavis: “कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपिचंद पडळरांना तंबी

मुंबई | Mumbai
भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि वाद हे काही नवे समिकरण नाही. पडळकर यांनी याआधी अनेकदा आपल्या विधानांनी वाद ओढवून घेतलेला आहे. आता पडळकर यांनी माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जंयत पाटील यांच्या पालकांबाबत वादग्रस्त विधान केले असून त्याचे राजकीय पडसाद उमटत आहेत. गोपीचंद पडळकरांच्या या विधानावरुन शरद पवार गट आक्रमक झाला आहे. तसेच शरद पवार यांनी देखील आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करत गोपीचंद पडळकरांनी केलेल्या विधानावरुन नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांचे वडील, दिवंगत नेते राजाराम बापू पाटील यांचा उल्लेख करत अश्लाघ्य विधान केले होते. या विधानानंतर सांगली जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून पडळकर यांच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. तसेच अजित पवारांनीही राजकीय संस्कृती जपायला हवी, असा टोला लगावला आहे.

- Advertisement -

गोपीचंद पडळकर यांनी जे विधान केलेय ते योग्य आहे, असे माझेही मत नाही. कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल विधान करणे योग्य नाही. या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे त्यांनाही मी सांगितलेय, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच मला शरद पवारांचा फोन आला होता. मीही त्यांना सांगितले, अशा प्रकारच्या विधानाचे आम्हीही कधीच समर्थन करणार नाही. गोपीचंद पडळकर हे तरूण नेते आहेत.

गोपीचंद पडळकर हे एक तरुण नेते आहेत. अनेकदा आक्रमकता दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल, हे ते लक्षात घेत नाहीत. हे लक्षात ठेवून आक्रमकता दाखवली पाहिजे, असे त्यांना मी सांगितले. तुम्हाला (गोपीचंद पडळकरांना) भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे. आपण बोलत असताना काय विचार निघतील, याचा विचार करायला हवा, असा मी सल्ला गोपीचंद पडळकरांना सल्ला दिल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना दिली.

पडळकर काय म्हणाले?
दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपले विधान अयोग्य नसून त्यावर माफी मागणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच याबाबत शरद पवारांनी फडणवीसांना केलेल्या फोनवर बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मातोश्रीवर जेव्हा विधान केले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला होता का? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईबद्दलचा चुकीचा व्हिडीओ AI द्वारे तयार केला गेला. त्यावर पवारांनी मोदींना फोन केला का? असे प्रश्न पडळकर यांनी उपस्थित केले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

‘ऑपरेशन टायगर’ला ब्रेक! उद्धव ठाकरेंचा खासदार ओमराजे निंबाळकरांशी फोनवरून संवाद, उद्या...

0
मुंबई | Mumbai गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेत असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरे सेनेचे खासदार फोडून 'ऑपरेशन टायगर' यशस्वी केल्याचे बोलले जात...