Sunday, October 11, 2026
HomeनाशिकNashik News : मुख्यमंत्री फडणवीसांचे नाशकात आगमन; 'लोकप्रतिनिधींचा महाकुंभ' कार्यक्रमात आदर्श सरपंचांचा...

Nashik News : मुख्यमंत्री फडणवीसांचे नाशकात आगमन; ‘लोकप्रतिनिधींचा महाकुंभ’ कार्यक्रमात आदर्श सरपंचांचा होणार सन्मान

नाशिक | Nashik

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काही वेळापूर्वी ओझर विमानतळावर (Ozar Airport) आगमन झाले आहे. यावेळी समवेत महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा (विदर्भ, तापी व कृष्णा खोरे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन होते. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मुख्यमंत्री व मंत्री यांचे स्वागत केले.

- Advertisement -

ग्रामविकासाला चालना देणे आणि दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शाश्वत जलव्यवस्थापनाबाबत जनजागृती व ग्रामपातळीवरील नियोजनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या वतीने आज (रविवार) नाशिक (Nashik) येथील मोदी ग्राउंडवर ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान – सन्माननीय लोकप्रतिनिधींचा महाकुंभ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) उपस्थितीत झाले असून, या कार्यक्रमात सुमारे १० हजार सरपंच, ग्रामस्थ, ग्रामसेवक आणि लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत.सदर कार्यक्रमात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५-२६’चा बक्षीस वितरण समारंभ तसेच ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० (२०२६-२७)’चा शुभारंभ करण्यात येणार आहे. अभियानांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा (Grampanchyat) गौरव करण्यात येणार असून, आदर्श सरपंचांचाही सन्मान करण्यात येणार आहे.

सरपंच परिसंवाद

कार्यक्रमांतर्गत ‘सरपंच परिसंवाद – दुष्काळावर मात, जलसमृद्ध गावाचा संकल्प’ आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादात भूगर्भातील जलसाठ्याचे संवर्धन, उपलब्ध पाणीसाठ्याचा परिणामकारक वापर, भूजल पातळीत वाढ, जलसंधारण आणि दुष्काळी परिस्थितीचे व्यवस्थापन या विषयांवर चर्चा होणार आहे. तसेच गावपातळीवर पाण्याचे नियोजन करताना ‘वॉटर बजेट’ तयार करणे, पावसाच्या पाण्याची साठवणूक करणे आणि उपलब्ध जलस्रोतांचा योग्य वापर करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी कोण होते उपस्थित?

यावेळी आमदार गोकुळ गिते, प्रा. देवयानी फरांदे, दिलीप बनकर, ॲड राहुल ढिकले, विशेष पोलिस महानिरीक्षक संजय ऐनपूरे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सिंहस्थ कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा, सार्वजानिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, निफाड उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार विशाल नाईकवाडे आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळतोय सर्वाधिक भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला (Onion) प्रतिक्विंटल सर्वाधिक 4200 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची बाजार समिती...