Saturday, September 12, 2026
Homeमुख्य बातम्याSamruddhi Highway : समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणानंतर मुख्यमंत्र्यांची मिश्किल टिप्पणी; म्हणाले, "तिघंही तीन...

Samruddhi Highway : समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणानंतर मुख्यमंत्र्यांची मिश्किल टिप्पणी; म्हणाले, “तिघंही तीन शिफ्टमध्ये…”

नाशिक | Nashik

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi highway) इगतपुरी ते आमणे या ७६ किलोमीटर लांबीच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत पार पडले. या चौथ्या टप्प्याच्या लोकार्पणामुळे समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला झाला आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकाच गाडीतून समृद्धी महामार्गावरून प्रवास केला. यावेळी गाडीचे स्टेअरिंग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती घेतले होते. या प्रवासानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी “आमची गाडी (Car) छान चालली आहे”, असे म्हणत मिश्कील टिप्पणी केली.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “आम्ही तिघेही एकत्र गाडी चालवत आहोत, काही काळजी करु नका. आम्हाला एकमेकांच्या गाडीत बसायची सवय आहे. आमची गाडी एकदम छान चालली असून, आम्ही तिघेही तीन शिफ्टमध्ये चालवत आहोत”, असे त्यांनी म्हटले. तसेच महायुतीच्या कार्यकाळात या महामार्गाचे उद्घाटन होत असल्याचा आम्हाला आनंद असून, आता असाच शक्तीपीठ महामार्ग आम्हाला पुढच्या टप्प्यात करायचा आहे”, असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.

दरम्यान, एमएसआरडीसीने मुंबई ते नागपूर हे अंतर आठ तासांतच पार करता येण्यासाठी ७०१ किलोमीटर लांबीचा ५५ हजार कोटी रुपये खर्चाचा समृद्धी महामार्ग प्रकल्प हाती घेतला होता. यामध्ये राज्यातील १० जिल्हे, २६ तालुक्यासह ३९२ गावांमधून जाणाऱ्या या सहा पदरी महामार्गाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात आले आहे. या महामार्गासाठी ५५ हजार ५०० कोटींची खर्च अपेक्षित होता. मात्र, हा खर्च ६१ हजार कोटींवर पोहोचला आहे. या महामार्गासाठी तब्बल १२ कोटी सिमेंट बॅग वापरण्यात आल्या असून, ७ लाख मेट्रिक टन स्टीलचा वापर रस्ता उभारण्यासाठी करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

नाशिकमध्ये शिक्षक संघटनांचा मोर्चा; प्रा. सोपान बोरसे यांच्या मृत्यूची चौकशी करा;...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik महात्मा गांधी विद्यामंदिर, नाशिक संचलित समाजश्री प्रशांतदादा हिरे (म्युनिसिपल) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मालेगाव येथील प्राध्यापक कै. सोपान खंडेराव बोरसे...