Sunday, November 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, दोन्हीही स्वतंत्र...

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, दोन्हीही स्वतंत्र…

मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. प्रफुल पटेल आणि शरद पवार यांची रुग्णालयातील भेट, १० नोव्हेंबरनंतर एकत्र बसून चर्चा करण्याचे संकेत आणि सुनील तटकरे यांनी विलीनीकरणाबाबत केलेला मोठा खुलासा यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली होती. विलीनीकरणाचा निर्णय हा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचा अंतर्गत विषय असून, त्यांनी निर्णय घेतल्यानंतर भाजप आपली भूमिका मांडेल, असे त्यांनी म्हटले होते.

विलीनीकरणाचा निर्णय राष्ट्रवादीनेच घ्यायचा : फडणवीस
शेवटी ते दोन पक्ष आहेत, दोन्हीही स्वतंत्र पक्ष आहेत. त्या दोन्ही पक्षांचे निर्णय ते मिळून घेतील. त्यांच्या पक्षात शरद पवार साहेबांसारखे मोठे नेते आहेत. तिकडे सुनेत्रा पवार आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत, सुनील तटकरे आहेत, पार्थ पवार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्याबद्दल आम्ही काही बोलणं किंवा निर्णय करणं हे काय योग्य होणार नाही. त्यांचे त्यांचे निर्णय ते घेतील. परंतु कोणताही निर्णय घेताना ते आम्हाला विचारात घेतील, कारण एनडीए युतीमधील आम्ही मोठे पार्टनर आहोत. त्यामुळे आज तरी या संदर्भात आम्ही त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही, त्यांनी अद्यापर्यंत तरी आम्हाला या संदर्भांत काहीही विचारलेलं नाहीये. जर त्यांच्या चर्चा सुरू असतील तर ते आम्हाल विचारतील, आम्ही त्यावर प्रतिक्रिया देऊ असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर! फेब्रुवारीत बोर्डाचा बिगुल; प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखाही स्पष्ट

‘अजितदादा असते तर भाजपला विश्वासात घेतले असते’
यापूर्वी विलीनीकरणाच्या चर्चांवर भाष्य करताना फडणवीस यांनी दिवंगत अजित पवार यांच्याशी असलेल्या संबंधांचाही उल्लेख केला होता. अजित पवार प्रत्येक महत्त्वाची राजकीय घडामोड त्यांच्याशी शेअर करत असत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या विलीनीकरणाबाबत अंतिम टप्प्यात चर्चा सुरू असती, तर अजित पवार यांनी भाजपला विश्वासात घेतले असते, असे फडणवीस यांनी म्हटले होते. अजित पवार महायुती सरकारमध्ये सहभागी होते. त्यामुळे विलीनीकरणासारखा मोठा निर्णय घेताना भाजपशी चर्चा झाली असती, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती.

ताज्या बातम्या

Pathardi : भगवानगडाच्या पायथ्याशी विहिरीत आढळले आठ दुचाकीचे सांगाडे

0
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi पाथर्डी तालुक्यातील भगवानगडाच्या (Bhagwangad) पायथ्याशी घोगस पारगाव रस्त्यालगत असलेल्या जुन्या विहिरीमध्ये (Well) तब्बल आठ दुचाकीचे सांगाडे व अवशेष आढळून आल्याने...