मुंबई | Mumbai
मनोज जरांगे पाटील हे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षणाच्या मागण्यासाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय आपण उपोषण सोडणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. मात्र, काही मराठा आंदोलक हे आझाद मैदान सोडून चक्क मुंबई महापालिकेच्या समोर येऊन ठिय्या आंदोलन करत आहेत. मराठा आंदोलक काल रात्रभर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील फलाटांवर झोपले होते. मात्र, आज सकाळी आझाद मैदानाच्या परिसरात असलेल्या अनेक शौचालयांमध्ये पाणी नव्हते. तसेच मुंबई महानगरपालिकेने या परिसरातील हॉटेल्स आणि खाऊगल्ली बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी मराठा आंदोलकांचे खाण्याचे प्रचंड हाल झाल्याचे दिसून आले आहे.
मनोज जरांगे यांनी मुंबईत सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. जोपर्यंत सगळ्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असे आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले आहे.
जरांगे यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचे आणि वाहतूक कोंडी टाळण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, “गोरगरीब मराठ्यांना सन्मान द्या, त्यांचा अपमान करू नका.” तसेच, त्यांनी सरकारवर महाराष्ट्रात गैरसमज पसरवत असल्याचा आरोपही केला. “आम्ही ओबीसींच्या 30 टक्के आरक्षणातून 20 टक्के आरक्षण मागत नाही. आम्ही फक्त आमच्या नोंदी ओबीसी आरक्षणामध्ये घ्या, अशी मागणी करत आहोत. मराठा आणि कुणबी एकच आहेत, त्यामुळे कोणताही संभ्रम निर्माण करू नका,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना म्हंटले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आरक्षण द्यायचे नाही, तर फक्त राजकारण करायचे आहे.”आम्हाला राजकारण नको, फक्त आरक्षण हवे आहे,” असे जरांगे यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी आंदोलकांना पोलिसांनी सांगितलेल्या ठिकाणी आपली वाहने सुरक्षितपणे उभी करण्याचे आणि संयम राखण्याचे आवाहन केले. “सगळी मुंबई मराठा झाली आहे. शांत राहा आणि आपण वाट पाहू,” असे म्हणत त्यांनी आंदोलकांना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले.
सकाळपासूनच सीएसटीच्या पुढे ठिय्या आंदोलन करताना मराठा समाजाचे कार्यकर्त्ये दिसले. यामुळे मोठी वाहतूककोंडी झाली. यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलांचे पाणी आणि अन्न बंद केल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. त्यांनी म्हटले की, राज्यामध्ये काही झाले आणि राज्यअस्थीर झाले तर याला फक्त आणि फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असतील. बीएमसीच्या रस्त्यावर सकाळपासून मराठा आंदोलक ठिय्या करत आहेत.
गोंधळ घालणाऱ्यांचा उद्देश काय आहे मला माहिती नाही. तुम्ही आंदोलनाची दिशा शांततेत ठेवा. बघुया किती दिवस हे असे ठेवातात. खरेच आपल्याला आरक्षण देतात की नाही. सीएसएमटीबाहेर मराठा आंदोलकाकडून दोन तासापासून आंदोलन. सीएसएमटी रेल्वे स्थानकातही आंदोलकांचा गोंधळ, सोयीसुविधा देणे पालिकेचे काम आहे. मुख्यमंत्र्यांचे ऐकून पाणी, दुकाने बंद केले हे लक्षात ठेवू. होऊदे हाल, बघु किती दिवस हाल करतात.
‘फडणवीस साहेबांनी सगळ्या मागण्यांची अंबलजावणी करणे गरजेचे आहे. त्यांनी करावी. उपोषणाच्या काळात चौथ्या दिवसापासून तोंडाला पाणी यायला सुरूवात होते. पण आता दुसऱ्या दिवसापासूनच सुरू झालेय. कारण, दोन दिवसांपासूनचा प्रवास अन् आधीच्या उपोषणामुळे हे होतेय. त्यामुळे शरिराला जास्तीचा परिणाम होतोय’, अशी प्रकृती बाबतीत माहिती जरांगे पाटलांनी दिली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





