Monday, October 14, 2024
Homeब्रेकिंग न्यूजकाँग्रेसचा आरक्षणविरोधी खरा चेहरा उघड…; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राहुल गांधींचा खरपूस समाचार

काँग्रेसचा आरक्षणविरोधी खरा चेहरा उघड…; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राहुल गांधींचा खरपूस समाचार

मुंबई | Mumbai
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यादरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. त्यांच्या या टीकानंतर आता सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याच मुद्द्यावरून राहुल गांधी यांच्यावर खरपूस समाचार घेतला आहे. आरक्षण संपवण्याचा मनसुबा राहुल गांधी यांनी अमेरिकेत व्यक्त केला असून आरक्षणाला धक्का लावण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही हाणून पाडू, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत लिहिले की, ‘विदेशात जाऊन सातत्याने भारताची येथील नागरिकांची बदनामी करण्याचा उद्योग विरोधी पक्षनेते, लोकप्रतिनिधी राहुल गांधी करतात. परदेशात जाऊन मनाला येईल ते बरळणे, बेछूट आरोप करणे लोकप्रतिनिधीला शोभत नाही. मात्र बोलताना त्यांनी काँग्रेसचा आरक्षणविरोधी खरा चेहरा उघड केला.’ आरक्षण संपवण्याचा मनसुबा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत व्यक्त केला आहे. आरक्षण संपवण्याची भाषा करणारे राहुल गांधी यांचे हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे.

- Advertisement -

‘राहुल गांधी यांनी बाबासाहेब आंबेडकरांना धोका दिला आहे. बाबासाहेबांना काँग्रेसने धोका देऊन पराभूत केले. जे बाबासाहेबांना धोका देऊ शकतात ते आरक्षणाला कधीही धोका देऊ शकतात. बाबासाहेब नेहमी सांगायचे काँग्रेस हे जळके घर आहे. बाबासाहेबांना जो काही अनुभव होता त्याच्यातून ते विचार मांडत होते, सांगत होते. याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. बाबासाहेबांनी आणि संविधानाने दिलेल्या जे आरक्षण आहे. हे आरक्षण कायम राखण्यासाठी महायुती सरकार आणि एनडीए सरकार, राज्य सरकार, केंद्र सरकार या आरक्षणाच्या पाठीशी आहे,’ असं एकनाथ शिंदे म्हणाले.

‘आरक्षण रद्द करण्याची हिंमत जो करेल त्याच्या विरोधात केंद्र सरकार, राज्य सरकार उभा राहील. ज्यांना आरक्षण मिळाले आहे, त्यांचा खरा चेहरा काँग्रेसचा कळला असेल. लोकसभेमध्ये याच लोकांनी फेक नॅरेटिव्ह पसरवून संविधान बदलणार, बाबासाहेबांनी संविधानात दिलेले आरक्षण रद्द करणार हेच आता लोकसभेच्या निकालानंतर बोलत आहेत. काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा जनतेसमोर आलेला आहे, याचा मी निषेध करतो, याची निंदा करतो,’ असे म्हणत शिंदे यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर टीका केली.

‘हे देशप्रेम काय आहे. या तमाम देशभक्तांनी, देशप्रेमींनी याचा विचार केला पाहिजे. हे आत्ताच नाही अनेक वेळा राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे प्रमुख आहेत, विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्याकडून देशाची बदनामी करणे, देश आपला मागे आहे आणि इतर देशाचा उदो उदो करणार हे कुठलं देशप्रेम आहे? ही कुठली राष्ट्रभक्ती? याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे.

‘जगाला हेवा वाटावा अशी भारताचे नावलौकिक जगामध्ये, भारताचे आहे. आपल्या भारताचे नाव पूर्ण जगभरात पोहोचवण्याचे काम आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे. इतर देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था 11 नंबर वरून पाचव्या नंबरवर आणणे आणि आता तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचा संकल्प आहे. देशाला महासत्तेकडे घेऊन जाण्याचा स्वप्न पाहणे हे एकीकडे आहे. हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभक्तीचे बात करत आहेत आणि दुसरीकडे देशविरोधी, देशाचा अपमान करणारे वक्तव्य राहुल गांधी यांनी केलेले आहे म्हणून मी त्यांचा निषेध करतोय,’ असेही शिंदे म्हणाले.

संविधान विरोधी कोण? संविधान विरोधी कोण? हे यांच्या बोलण्यातून आज दिसलेलं आहे. संविधनाला मानणारी जनता या देशातली सुज्ञ आहे. येणाऱ्या काळात काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

काय म्हणाले होते राहुल गांधी?
दरम्यान, जातिनिहाय जनगणना आणि आरक्षण या दोन मुद्द्यांवरून काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मागच्या काही दिवसांपासून कमालीचे आक्रमक आहेत. दरम्यान, सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षण कधीपर्यंत सुरू राहणार? या एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मोठं विधान केलं आहे. जेव्हा भारतात आरक्षणाच्या दृष्टीने समानता असेल, तेव्हाच काँग्रेस पक्ष देशामधील आरक्षण संपुष्टात आणण्याबाबत विचार करेल. सध्यातरी अशी स्थिती नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या