Wednesday, June 10, 2026
HomeनाशिकNashik Suicide News : सप्तश्रृंगी गडाच्या शीतकड्यावरून उडी घेऊन तरुणाची आत्महत्या

Nashik Suicide News : सप्तश्रृंगी गडाच्या शीतकड्यावरून उडी घेऊन तरुणाची आत्महत्या

सप्तश्रृंग गड| प्रतिनिधी | Saptashrung Gadh

श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी (Saptashrungi Gadh Darshan) आलेल्या ब्राह्मणवेल ता. साक्री येथील तरुणाने (Youth) शीतकड्यावरुन खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : अंगठीचा फास, धनादेशांचा तपास; भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात तीन दिवसांची पोलीस कोठडी

याबाबत अधिक माहिती अशी की, श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर भगवतीच्या दर्शनासाठी ३६ वर्षीय तरुण आज (मंगळवारी) सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास गडावर आला होता. यावेळी त्याने अज्ञात कारणावरून सप्तश्रृंगी गडाच्या शितकड्यावरुन खोल दरीत उडी मारली. यासंदर्भातील माहिती कळवण पोलिसांना मिळताच त्यांनी दिंडोरी तालुक्यातील (Didnori Taluka) भातोडे येथील शितकड्याच्या पायथ्यातील शिवारात स्थानिकांच्या आणि आपत्ती व्यवस्थापन व वनविभागाच्या मदतीने शोध घेतला.

हे देखील वाचा : Nashik TCS Case : ‘मालेगाव पार्टी’ रडारवर; पीडितेची ओळख पुसण्याचा होता कट

यावेळी सुमारे ८०० ते ९०० फुट खोल दरीत अज्ञात इसमाचा मृतदेह (Dead Body) आढळून आला. याप्रकरणी वणी पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल पाटील, कळवण पीआय खगेंद्र टेंभेकर, पोलीस हवालदार व्ही. जी. साबळे, योगेश गवळी, मन्साराम बागुल, संदीप बत्तीशे यांच्यासह आदी करत आहेत. वणी ग्रामीण रुग्णालयात (Vani Rural Hospital) सायंकाळी उशिरा शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सदर तरुण हा उसतोड कामगार व शेतमजुरी करणारा असल्याची माहिती समोर आली आहे.

ताज्या बातम्या

Nashik Trimbakeshwar Crime News : त्र्यंबकेश्वरमध्ये चार हॉटेल्सवर गुन्हे; ग्राहकांच्या नोंदी...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Nashik Rural Police) सुरक्षेचा मोर्चा हॉटेल आणि लॉजिंग व्यावसायिकांकडे वळवला आहे. पोलिस अधीक्षक डॉ....