Wednesday, June 10, 2026
Homeक्राईमCrime News : नेवासा खुर्दमध्ये पोलिसांचा छापा

Crime News : नेवासा खुर्दमध्ये पोलिसांचा छापा

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा तालुक्यातील नेवासा खुर्द येथील नाईकवाडी कुरेशी मोहल्ल्यात गोमांस विक्री सुरू असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून दोन जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत सुमारे 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नेवासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांना गुप्त बातमीदारामार्फत संबंधित माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले. पथकाने पंचांसह नाईकवाडी कुरेशी मोहल्ला, नेवासा खुर्द येथे जाऊन छापा टाकला.

- Advertisement -

यावेळी अरबाज चौधरी (वय 29, रा. नाईकवाडी मोहल्ला, नेवासा खुर्द) हा गोमांस कापून विक्री करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला जागीच ताब्यात घेऊन पंचासमक्ष झडती घेतली असता गोमांस जप्त करण्यात आले. दरम्यान, शेजारील परिसरातही अशाच प्रकारे गोमांस विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी आयाज शेख यांच्या राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर तपास केला. तेथे आवेज आयाज शेख हा गोमांस विक्री करताना आढळून आला. त्यालाही ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईत एकूण अंदाजे 155 किलो गोमांस (किंमत सुमारे 46,500 रुपये), इलेक्ट्रिक वजन काटा (1,000 रुपये), दुसरा वजन काटा (500 रुपये) व एक सत्तूर असा एकूण सुमारे 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल श्रीनाथ नवनाथ गवळी यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध प्रचलित कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Meenakshi Natarajan : मोठी बातमी! काँग्रेसला निवडणुकीपूर्वी धक्का; उमेदवार मीनाक्षी नटराजन...

0
दिल्ली । Delhi देशभरात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात राज्यसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असतानाच, राजकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक वृत्त समोर आले आहे. काँग्रेसच्या माजी...