मुंबई | Mumbai
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा लागू करण्याच्या निर्णयाला उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि विरोधकांनी टोकाचा विरोध दर्शवला होता. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन मोर्चा काढण्याचेही ठरवले होते. मात्र अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला १६ एप्रिल आणि १७ जूनचे दोन्ही अध्यादेश रद्द करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यानंतर ठाकरे बंधू एकत्र येत आहेत म्हणूनच तुम्ही जीआर रद्द केला अशी टीका त्यांच्यावर होऊ लागली आहे. याचपार्श्वभूमीवर आता दोन्ही पक्षांकडून विजयी मेळावा काढण्यात येणार आहे. मात्र त्याआधीच देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही ठाकरे बंधूंचा बंदोबस्त केला. मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून जीआर रद्द केला का? असा आरोप होताना दिसत आहे. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही निर्णय घेताना कोणत्याही पक्षाचे हित पाहणार नाही, आम्ही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे हित पाहणार. त्यामुळे कुणाच्याही दबावाखाली न येता योग्य तोच निर्णय घेऊन असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. दोन ठाकरे बंधू एकत्र येऊ नये असा काही जीआर आम्ही काढला नाही, त्यांनी एकत्र यावे आणि किक्रेट खेळावे, जेवण करावे. आम्हाला त्याचा काही फरक पडणार नाही असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मी काही असा जीआर काढला आहे का?
“मी एखादा निर्णय घेतला तरीही दोन भावांना एकत्र यायचे आहे तर मी काही असा जीआर काढला आहे का? की दोन भावांनी एकत्र येऊ नये? उद्ध ठाकरेंच्या कार्यकाळात जो अहवाल आला होता जो अहवाल लिहण्यात त्यांचा उजवा हात, त्यांचा विश्वासू नेता होता. त्यांनी लिहिले की पहिली ते बारावी हिंदी सक्तीची करा, तो अहवाल उद्धव ठाकरेंनी त्यावेळी कॅबिनेटमध्ये स्वीकारला आणि नेहमीप्रमाणे घूमजाव केले. पण आम्हीही कुठलाही अहंकार न बाळगता निर्णय घेतला. मी पुन्हा सांगतो आम्ही निर्णय केला आहे. आता समिती स्थापन केली आहे. समिती ठरवेल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
त्यांनी एकत्र यावे, क्रिकेट खेळावे, एकत्र जेवावे
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते दोघे एकत्र येत असतील तर मला आनंद आहे. पण मी कालचं म्हटले की, राज ठाकरे जो प्रश्न आम्हाला विचारताच, तोच प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारायला पाहिजे. तुमच्या काळामध्ये हिंदी सक्तीचा निर्णय का घेण्यात आला? हा प्रश्न राज ठाकरे यांनी कधीतरी उद्धव ठाकरे यांना विचारायला पाहिजे. बाकी त्यांनी एकत्रित यावे, क्रिकेट, हॉकी, टेनिस खेळाव, स्विमिंग करावे किंवा एकत्र जेवावे, आम्हाला काही अडचण नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना आवाहन केले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





