Monday, June 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजGokul Gite : मंत्री उदय सामंत नवनिर्वाचित आमदार गोकुळ गितेंना घेऊन मुंबईकडे...

Gokul Gite : मंत्री उदय सामंत नवनिर्वाचित आमदार गोकुळ गितेंना घेऊन मुंबईकडे रवाना; शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार?

नाशिक | Nashik

नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) निकालात महायुतीला (Mahayuti) मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करत अपक्ष उमेदवार गोकुळ गिते (Gokul Gite) यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र, या विजयानंतर अवघ्या काही तासांतच नाशिकच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. नवनिर्वाचित आमदार गोकुळ गिते यांना शिवसेनेचे मंत्री उदय सामंत हे ओझर विमानतळावरून घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहेत. गोकुळ गिते हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज (सोमवार) सांयकाळी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे शिवसेनेची विधान परिषदेतील ताकद आणखी वाढणार आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election Result : नाशिकमध्ये महायुतीला धक्का; अपक्ष उमेदवार गोकुळ गिते विजयी

याबाबत अधिक माहिती अशी की, विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गोकुळ गिते यांचे फोनवरून अभिनंदन केले. तसेच त्यांना तात्काळ मुंबईतील ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी भेटीसाठी बोलावले. यानंतर मंत्री उदय सामंत आणि जळगावच्या पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील (MLA Kishor Patil) हे विशेष विमानाने नाशिकच्या ओझर विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर आमदार किशोर पाटील हे गोकुळ गिते यांना घेण्यासाठी त्यांच्या नाशिकमधील घरी दाखल झाले.

हे देखील वाचा : MLA Gokul Gite : काँग्रेसमधून राजकारणास सरुवात ते आमदारकीपर्यंत मजल; महायुतीच्या उमेदवाराला पराभवाची धूळ चारणारे गोकुळ गिते नेमके कोण?

दरम्यान, यानंतर गोकुळ गिते यांच्यासह त्यांचे बंधू गणेश गिते हे मंत्री उदय सामंत आणि आमदार किशोर पाटील यांच्यासह ओझर विमानतळावरून (Ozer Airport) विशेष विमानाने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. सध्या गिते हे मुंबईच्या दिशेने प्रवासात असून काही वेळातच ते शिंदेंची भेट घेणार आहेत. या भेटीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्यांचा शिवसेनेत (शिंदे गट) अधिकृत प्रवेश होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election Result : “माझा विश्वासघात…”; पराभवानंतर नरेंद्र दराडेंची संतप्त प्रतिक्रिया

गिते समर्थकांचा शिंदेंच्या गाण्यावर जल्लोष

आज सकाळी गोकुळ गिते यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होताच, त्यांच्या समर्थकांनी नाशिकमध्ये जोरदार जल्लोष केला. विशेष म्हणजे, कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाण्यांवर ठेका धरत डान्स केला. समर्थकांच्या या जल्लोषामुळे गिते हे शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

महायुती आणि शिवसेनेचे संख्याबळ वाढणार

नाशिकची जागा महायुतीमध्ये शिवसेनेला सुटली होती आणि पक्षाने नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, पक्षांतर्गत बंडाळी किंवा स्थानिक समीकरणामुळे अपक्ष लढलेल्या गोकुळ गिते यांनी बाजी मारली. आता गिते हेच पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात असून, तांत्रिकदृष्ट्या ही जागा महायुती आणि शिवसेनेच्याच खिशात राहणार आहे. परिणामी, विधान परिषदेत शिवसेनेचे संख्याबळ अधिक मजबूत होणार आहे.

हे देखील वाचा : Gokul Gite : दराडे निष्क्रिय म्हणून मतदारांनी मला निवडले – गोकुळ गितेंचा हल्लाबोल

ताज्या बातम्या

Nashik Crime News : अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याची...

0
ओझे l वार्ताहर | Oze नाशिक शहरात (Nashik City) अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याची खोटी बतावणी करून बेकरी व्यावसायिकांकडून पैसे उकळणाऱ्या तिघांविरुद्ध एमआयडीसी...