Monday, August 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूजटिपू सुलतान हा चांगला होता की नाही, नंतरची गोष्ट, पण…; मुख्यमंत्री फडणवीसांचा...

टिपू सुलतान हा चांगला होता की नाही, नंतरची गोष्ट, पण…; मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर साधला निशाणा

मुंबई | Mumbai
टिपू सुलतान हा चांगला होता की नाही, नंतरची गोष्ट आहे. पण आमचा आक्षेप या गोष्टीवर आहे की, कोणीतरी म्हणते टिपू सुलतान छत्रपती शिवरायांपेक्षा मोठे राजे होते. छत्रपती शिवरायांइतके गुणगान टिपू सुलतानाचे केले पाहिजे, असे म्हटले जाते, या गोष्टीवर आमचा आक्षेप आहे. या अभिभाषणावर दोन दिवस म्हणजेच मंगळवारी (ता. 24 फेब्रुवारी) आणि बुधवारी (ता. 25 फेब्रुवारी) विधानसभेत चर्चा झाली. या चर्चेवर आज गुरुवारी (ता. 26 फेब्रुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. त्यांनी त्यांच्या उत्तराच्या सुरुवातीलाच विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आणि संपूर्ण भाषणात विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

७५ हजार हिंदू आणि ३३ हजार नायरांची कत्तल केली, हे कधी शिकवण्यात आले नाही
गेली अनेक वर्षे या देशाच्या इतिहासाशी छेडछाड करण्यात आली. वर्षानुवर्षे आपल्याला हे शिकवण्यात आले की, टिपू सुलतान हे महान राजे होते. पण टिपू सुलतानाने ७५ हजार हिंदू आणि ३३ हजार नायरांची कत्तल केली, हे कधी शिकवण्यात आले नाही. ते इंग्रजांशी का लढले हे कोणी सांगितले नाही. टिपू सुलतान स्वत:चे राज्य वाचवायला इंग्रजांशी लढला, हे आपल्याला कधीच सांगण्यात आले नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

अजित पवारांचा अपघाती मृत्यू की घातपात? CID चे अधिकारी म्हणाले, ३ महत्वाचे उद्देश्य…

विरोधकांच्या मनात फार मोठी गल्लत आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ही सर्व चर्चा पाहिल्यानंतर आणि विरोधी पक्षाचा सूर पाहिल्यानंतर विरोधी पक्ष भ्रमीत आणि संभ्रमित असल्याचे वाटले. म्हणजेच, कन्यफ्युझ्ड आणि पझल्ड असल्यासारखे विरोधक वाटले. त्यामुळे माझी सूचना आहे की, विरोधकांनी भ्रमात राहून धावण्यापेक्षा संभ्रमात राहून शांतपणे विचार मांडले तर महाराष्ट्राच्या विकासात आपले योगदान वाढेल. राज्यपालांच्या भाषणातील सगळ्या गोष्टींच्या संदर्भात एकतर विरोधकांच्या मनात फार मोठी गल्लत आहे किंवा त्यांनी तो विषय समजून घेतलेला नाही. परंतु, मोठी लोक समोर बसली आहेत, त्यामुळे त्यांना तो विषय कळाला आहे, परंतु त्यांना समजून न घेता लोकांना संभ्रमित करायचे आहे, असे टीकास्त्र फडणवीसांनी डागले.

तर आज देशातील एकाही मुसलमानाने औरंगजेबाला हिरो म्हटले नसते
आता खरा इतिहास समोर येत आहे. वर्षानुवर्षे देशात एनसीआरटीच्या पुस्तकात मोघली साम्राज्याला 17 पाने देण्यात आली, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी या पुस्तकात एकच परिच्छेद होता. आता मोदी सरकारने एनसीआरटीच्या पुस्तकात मराठ्यांच्या इतिहासाला २० पाने दिली आहेत. योग्यवेळी नीट इतिहास शिकवला असता तर आज देशातील एकाही मुसलमानाने औरंगजेबाला हिरो म्हटले नसते. पण आपण खरा इतिहास कधीच शिकवला नाही. या देशात राष्ट्रभक्त मुसलमान आहेत. मला त्यांच्याविषयी कुठलाही आक्षेप नाही. पण जे लोक देशाच्या विरोधकांना आणि आक्रमणकाऱ्यांना हिरो मानतील, त्यांना आम्ही सोडणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : मी मेंदूचा डॉक्टर, पण राजकारणात आलो नी माझाच मेंदू...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नगर दक्षिणचे माजी खासदार, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत राहिले आहेत. राहुरीतील देवळालीत तिरंगा रॅली दरम्यान...