पुणे | Pune
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूच्या अनुषंगाने गुन्हे अन्वेषण विभाग अर्थआत सीआयडीकडे वर्ग करण्यात आलेल्या प्रकरणाबाबतीत आम्हाला काही महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. तपास अतिशय योग्य पद्धतीने सुरू आहे. अपघातामागे गुन्हेगारी कट आहे का? अकस्मित मृत्यूमागे घातपात आहे का? अशा दिशेने तपास सुरू असल्याची माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिली.
DGCA कडून मंगळवारी एक अहवाल आला. त्यात VSR कंपनीतील त्रुटी समोर आल्यानंतर DGCA ने या कंपनीची लिअरजेट विमाने उड्डाण करण्यास बंदी आणली. मात्र त्या अहवालातही या कंपनीला वाचवण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न करण्यात आला. VSR कंपनी चूक असेल तर DGCA चीही चूक आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. VSR कंपनीच्या मालकाला अटक केली पाहिजे अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात सीआयडीने पत्रकार परिषद घेऊन अतिशय वेगाने तपास होत असल्याची माहिती दिली आहे.
सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर सुरू करण्यात आलेल्या तपासाबाबत म्हटलेय की, बारामतीतील २८ जानेवारीच्या विमानाच्या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन अजित पवार आणि इतर व्यक्तींच्या अकस्मात मृत्यूचा तपास १९४ अंतर्गत सीआयडी कडे वर्ग करण्यात आला आहे. ते पत्रकार परिषदेत म्हणाले की, “अजितदादांच्या अपघाताचा तपास योग्य दिशेने सुरु आहे. हा तपास करण्यामागे तीन महत्त्वाचे उद्देश्य आहेत. यामध्ये पहिला उद्देश म्हणजे हा अपघात आहे की घातपात? तसेच दुसरा उद्देश आहे की, यामध्ये हलगर्जीपणा झाला आहे का? तसेच तिसरा उद्देश्य म्हणजे या अपघातामध्ये कोणतेही गुन्हेगारी कृत्य झाले आहे का? या दिशेने आमचा तपास सुरु आहे.” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
पहिल्या दिवसापासून प्रोफेशनल पध्दतीने तपास सुरु
गेल्या २८ दिवसांपासून आम्ही तपास करीत आहोत. यामध्ये आमच्या हाताला काही महत्त्वाच्या गोष्टी लागलेल्या आहेत. पहिल्या दिवसापासून अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने तपास सुरू आहे. AAIB यांच्याशी सातत्याने सीआयडीचा समन्वय असून गुन्ह्यामागे घातपात असल्याचे पुढे आले तर गुन्हा दाखल करून उर्वरित तपास पूर्ण करून न्यायालयात अभियोग चालविण्यासंबंधी पावली टाकली जातील, अशी महत्त्वाची माहिती सुनील रामानंद यांनी दिली.
“ब्लॅक बॉक्स सुरक्षित!” — AAIB, DGCA च्या अहवालाबाबत अजित दादांच्या निकटवर्तीयांची मोठी माहिती
अनेक संस्था या तपासात सहभागी आहेत. या संस्थांचा अहवाल देखील सीआयडीच्या तपासात समाविष्ट करण्यात येणार आहे. या अपघाताचा तपास सीबीआयकडे देण्यासाठी देखील पत्र देण्यात आले आहे. तपास योग्य दिशेने चालला आहे, अशी माहिती सीआयडी कडून देण्यात आली आहे. तर VSR कंपनीवर DGCA कडून कारवाई झालीय, तुमच्या तपासात या कंपनीकडून हलगर्जीपणा आढळून आलाय का? या प्रश्नावरती उत्तर देताना सीआयडीकडून सांगण्यात आलं की, तांत्रिक तपास हा वेगळा भाग आहे आणि आमचा CID चा तपास हा आकस्मिक मृत्यू बद्दल आहे. आमच्या तपासात काही पुरावे मिळाले आहेत. AAIB चा अहवाल आला की तो आमच्या तपासात समाविष्ट केला जाईल, सर्व तपास पूर्ण झाल्यानंतर सर्व निष्कर्ष निघतील, सर्व माहिती समोर येईल असंही त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.
यामध्ये आपल्याला बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय फॉरेन्सिक विभाग त्याचबरोबर पुण्यातील फॉरेन्सिक सायन्स लॅब एविएशन ऑथॉरिटी आणि इतर एजन्सी तसेच आपल्या केंद्रातील अन्य संस्था आपल्या तपासामध्ये सहकार्य करत आहेत. त्याचबरोबर AAIB त्यांच्याशी देखील सीआयडीचा सातत्याने समन्वय सुरू आहे आणि त्यांचा तपास संपल्यानंतर त्याचा अहवाल आपण अकस्मिक मृत्यूच्या तपासामध्ये त्याचा निष्कर्ष सुद्धा लक्षात घेणार आहे. तसेच सदर घटना त्याचे गंभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने सुद्धा या आकस्मिक मृत्यूचा तपास सीबीआय कडे वर्ग करण्यासाठी पत्र व्यवहार केलेला आहे. थोडक्यात या तपासामध्ये घातपात कट वगैरे किंवा कोणते प्रकारचे गुन्हेगारी कृत्य इत्यादी असे पण निष्पन्न झाल्यास यंत्रणा सीआयडी योग्य अशा कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याचा उर्वरित तपास पूर्ण करून न्यायालयमध्ये अभियोग चालवण्याची त्यांनी तयारी ठेवली आहे.
जर या तपासात घातपात, षडयंत्र, किंवा तत्सम काही गोष्टी समोर आल्या तर त्यानुसार पुढची कारवाई केली जाईल. राज्य सरकारने या प्रकरणात तपास सीबीआयने ताब्यात घ्यावा यासाठी पत्रव्यवहार केला आहे. विमान कंपनीबाबत डीजीसीएच्या अहवालानुसार इतर एजन्सीचचे रिपोर्ट येणे बाकी आहे. तपासात बरीच प्रगती आहे, वेगात तपास सुरू आहे. एएआयबीच्या तांत्रिक तपासाच्या अहवालाचाही समावेश या तपासात करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.





