Sunday, May 24, 2026
Homeजळगावचाळीसगावातून कॉकरोच जनता पार्टीचे २० हजार फॉलोवर्स..!

चाळीसगावातून कॉकरोच जनता पार्टीचे २० हजार फॉलोवर्स..!

सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद

- Advertisement -

चाळीसगाव | मनोहर कांडेकर Chalisgaon

सध्या सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) नावाचे मोठे राजकीय व्यंग्य वादळ सुरू आहे, ज्याचे इंस्टाग्रामवर काही दिवसांतच तब्बल११ मिलियन अधिक फॉलोअर्स झाले आहेत. त्यात चाळीसगाव तालुक्यातून जवळपास २० ते ३० हजार फॉलोवर असल्यांचा अंदाज बाधला जात आहे. या फॉलोवरमध्ये बेरोजगार तरुणासह राजकिय पार्टी विरोध रोष व्यक्त करणार्‍या तरुणांची संख्या प्रचंड असल्याचे दिसत आहे.

कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) या फनी आणि व्यंग्यात्मक मोहिमेला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळाला. अवघ्या काही दिवसांतच या पेजने अनेक मोठ्या राजकीय पक्षांच्या फॉलोअर्ससंख्येला मागे टाकले असून संध्या घडीला तब्बल ११ मिलियनहुन अधिक फॉलोअर्स झाले आहेत. या कोकरोच जणता पार्टी इंस्टाग्राम अकॉउंट चा आमच्या टीम ने अभ्यास केला असता, चाळीसगाव शहरतील काही इन्स्टा आयडी, पेज, आणि युवा नेतृत्व, सामाजिक कार्यकर्ते यांच्या मॅच्युल फ्रेंडलीस्ट बघुन चाळीसगाव तालुक्यातील सीजीबी फॉलोवर संख्या ही अंदाजे २५०००-३०,००० हजारावर असल्याचा अंदाज आहे.

यात एका मोठ्या पेज सीजीपीला ला फॉलो करत आहे, त्याची मॅच्युल फ्रेंड लिस्ट १७१ दिसत आहे, आणि त्या १७१ मधील प्रत्येकाच्या मॅच्युल आकडा हा सरसरी ४५ ते ५० दिसत आहे, म्हणजेच १७१बाय ५० असे एकूण ८५५० फॉलोअर्स दिसत आहे. तसेच ८५५० फॉलोवर लक्षात घेता निदान त्याचे ३ तरी आयडी (सीजीपी) फॉलो केल्यास २५ हजारच्या वर त्यांना जॉईन असल्याच चित्र चाळीसगाव तालुक्यात पाहायला मिळत आहे. यातून चाळीसगाव तालुक्यात जवळपास २० ते ३० हजार फॉलोअर्स असल्याचा अंदाज बांधला जात आहे.

१५ मे रोजी सुप्रीम कोर्टात एका सुनावणीदरम्यान, सरन्यायाधीश यांनी टिप्पणी केली होती की, काही बेरोजगार लोक कॉकरोचप्रमाणे (झुरळांसारखे) नकल करून लॉ, मीडिया आणि आरटीआई सारख्या प्रणालीत घुसतात. या विधानावर नाराजी व्यक्त करत, तरुणांनी इंटरनेटवर एक उपरोधिक राजकीय मोहीम सुरू केली. या मोहिमेची सुरुवात मूळचे महाराष्ट्रातील छत्रपति संभाजीनगर रहिवासी असलेले ३० वर्षीय राजकीय रणनीतिकार अभिजीत दीपके यांनी केली. त्यांनी अमेरिकेच्या बॉस्टन विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. ही कोणतीही अधिकृत नोंदणीकृत पार्टी नसून तरुणांच्या असंतोषाचे प्रतीक आहे. या फनी आणि व्यंग्यात्मक मोहिमेला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळाला. अवघ्या काही दिवसांतच या पेजने अनेक मोठ्या राजकीय पक्षांच्या फॉलोअर्ससंख्येला मागे टाकले आहे.

या मोहिमेची सुरुवात मुळचे महाराष्ट्रातील छत्रपति संभाजीनगर रहिवासी आहे. छ.संभाजीनगर हे चाळीसगावपासून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर असल्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील तरुणांनी कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी)च्या पेजला प्रचंड फॉलो करत असून ही संख्या अजुन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चाळीसगाव शहर व तालुक्यांची लोकसंख्या जवळपास ४ लाखांच्या घरात गेली आहे. चाळीसगाव तालुका हा तीन जिल्ह्याच्या सिमेवरील मध्यवर्ती तालुका आहे. या ठिकाणाहुन तीन महामार्ग जातात. येथे एमआयडीसी देखील आहे. परंतू बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तरुणांमध्ये प्रचंड रोष असून त्याविरोधात आवाज उठविण्यासाठी ते कॉकरोच जनता पार्टी (सीजेपीला) फॉलो करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘शब्दगंध’च्या माध्यमातून भाषा साहित्य व संस्कृतीचे जतन

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मराठी भाषा, आपले साहित्य आणि आपल्या संस्कृतीचे संवर्धन करण्याचे काम शब्दगंध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून गेल्या 16 वर्षापासून होत आहे. यामुळे अशी संमेलने...