Sunday, December 15, 2024
Homeदेश विदेशLPG Price Hike : महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! एलपीजी सिलिंडर महागला

LPG Price Hike : महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! एलपीजी सिलिंडर महागला

दिल्ली । Delhi

आज महिन्याचा पहिला दिवस. आजपासून नव्या महिन्याला सुरुवात झाली आहे. पण आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.

- Advertisement -

तेल वितरक कंपन्यांनी डिसेंबरच्या पहिल्या तारखेलाच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे.

देशभरात आजपासून १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात १६.५ रुपयांची वाढ केली आहे. त्याचवेळी १४ किलोच्या घरगुती वापराच्या सिलिंडरमध्ये मात्र कोणतीही वाढ केलेली नाही.

ही सामान्य जनतेसाठी तेवढी दिलासादायक बातमी आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मागच्या महिन्यातच दरवाढ करण्यात आली होती.

वाढलेल्या दरानुसार दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आता १८१८.५० रुपयांना मिळणार आहे. याआधी त्याची किंमत १८०२ एवढी होती. तर मुंबईमध्येही सिलिंडरच्या दरात वाढ झाले आहे.

कालपर्यंत १७५४.५० रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर आता १७७१ रुपयांना मिळणार आहे. तर चेन्नईमध्ये १९८०.५० आणि कोलकातामध्ये १९२७ रुपयांमध्ये व्यावसायिक सिलिंडर मिळणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या