Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशLPG Cylinder Price : १०० रुपयांनी स्वस्त झाला एलपीजी सिलेंडर, काय आहेत...

LPG Cylinder Price : १०० रुपयांनी स्वस्त झाला एलपीजी सिलेंडर, काय आहेत तुमच्या शहरांतील दर?

दिल्ली । Delhi

महागाईचा आलेख वाढतच चालला आहे. या महागाईमुळे सामन्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे. यातून आता दिलासा देणारी बातमी समोर येत आहे ती म्हणजे. अनेक शहरांमध्ये एलपीजी सिलेंडरच्या किमतींत कपात करण्यात आली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinders) दरांत १०० रुपयांची मोठी कपात करण्यात आली आहे. मात्र हे दरांमधील बदल घरगुती वापरातीली एलपीजी सिलेंडर्ससाठी लागू होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

- Advertisement -

मुंबईत व्यावसायिक एलपीजीच्या किंमती १,७३३.५० रुपये प्रति किलोंच्या घरात आहेत. त्या आता नव्या सुधारित दर कपातीनंतर अंदाजे १६३३.५० रुपये प्रति किलों असतील. राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत १६८० रुपयांवर पोहोचली आहे, हे दर गेल्या महिन्यातील दर वाढीनंतर ४ जुलै रोजी १७८० रुपयांवर पोहोचली होती.कोलकातामध्ये १८०२.५० रुपये असलेले दर १०० रुपयांच्या कपातीनंतर अंदाजे १७०२.५० रुपये प्रति किलों असतील. तर चेन्नईमध्ये १८५२.५० रुपये असलेले दर आता १७५२.५० रुपये करण्यात आले आहेत.

Train Firing : जयपूर-मुंबई पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये जवानाने चौघांवर गोळ्या का झाडल्या? कोण आहे आरोपी? नेमकं काय घडलं? वाचा…

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील गॅसचे दर

मुंबई – (११०२.५० घरगुती), (१६४०.५० व्यावसायिक)

ठाणे – (११०२.५०), (१६४०.५०)

नागपूर – (११५४.५०), (१८६४.५०)

पुणे – (११०६), (१७०१)

नाशिक – (११०६.५०), (१७१६)

छत्रपती संभाजीनगर – (११११.५०), (१७४५)

कोल्हापूर – (११०५.५०), (१६६०)

सातारा – (११०७.५०), (१७०८)

सोलापूर – (१११८.५०), (१७३२)

सिंधुदुर्ग – (१११७), (१६८७)

घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या (१४.२ किलो) दरात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. राज्याच्या राजधानीत मुंबईत घरगुती गॅसचा दर ११०२.५० रुपये इतका आहे. या किंमतीत शेवटचा बदल १ मार्च २०२३ रोजी झाला होता. तीन वर्षात घरगुती गॅसच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. सध्या घरगुती गॅस सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेला आहे. तसेच यावरील सबसिडी देखील बंद झाल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

खळबळजनक! वांद्रे-वरळी सी लिंकवर गाडी थांबवली अन् थेट पुलावरून मारली उडी, सर्च ऑपरेशन सुरु

- Advertisment -

ताज्या बातम्या