Saturday, April 25, 2026
HomeनगरAhilyanagar : अनुकंपा नियुक्ती सुधारित धोरण जाहीर

Ahilyanagar : अनुकंपा नियुक्ती सुधारित धोरण जाहीर

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शासकीय कर्मचार्‍याच्या वारसाला अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यासाठी न्यायालयांच्या न्यायनिर्णयांनुसार सुधारित धोरण शासनाने जाहीर केले आहे. यात, शैक्षणिक आणि वयोमर्यादेच्या अटी व शर्तींमध्ये बदल करण्यात आले आहेत, तसेच, अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांमध्येही सुलभता आणली आहे. सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे धोरण शासकीय कर्मचार्‍यांच्या वारसांना दिलासा देणारे आहे.

- Advertisement -

अनुकंपा नियुक्ती योजना 1976 पासून लागू करण्यात आली आहे. सन 1994 मध्ये पूर्वीची योजना अधिक्रमित करुन नवीन सुधारीत योजना निर्गमित करण्यात आली. त्यानंतर सन 1994 च्या योजनेमध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या असून या योजनेनुसार अनुकंपा नियुक्ती देण्यात येते. सदर अनुकंपा धोरणात पुढील प्रयोजनास्तव सुधारणा करण्याची आवश्यकता दिसून येत आहे.

1) न्यायालयीन अडचणी प्रामुख्याने न्यायालयीन प्रकरणे उद्भवली आहेत. कुटुंबास अर्ज सादर करण्यास झालेला विलंब क्षमापित करणे. प्रतिक्षासूचीवरील उमेदवार बदलणे. प्रतिक्षासूचीवरील उमेदवाराचे नाव वयाची 45 वर्षे पूर्ण झाल्याने वगळल्यास कुटुंबातील अन्य व्यक्तीचे नाव समाविष्ट करणे. या विविध न्यायालयीन प्रकरणी उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाने दिलेल्या न्यायनिर्णयानुसार अनुकंपा नियुक्ती योजना सुधारित करण्यात आली आहे.
2) अनुकंपा नियुक्तीच्या कार्यवाहीतील विलंब अनुकंपा नियुक्तीस विलंब होत असल्याने प्रतिक्षा सूचीतील उमेदवारांची संख्या वाढत आहे. तरी कार्यवाहीतील विलंब टाळण्यासाठी काही तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली.
3) योजनेचे सुलभीकरण आवश्यक सन 1994 पासून आजपर्यंत वेळोवेळी या विषयाबाबत एकूण 45 आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्यामुळे अनुकंपा तत्त्वावर प्रत्यक्ष नियुक्ती देत असताना हे विविध आदेश विचारात घ्यावे लागतात. तरी अंमलबजावणी करणार्‍या यंत्रणेला सर्व आदेश एकत्रित स्वरुपात मिळावेत यास्तव सर्व आदेशांचे एकत्रिकरण करणे.

अनुकंपा नियुक्ती कोणत्या परिस्थितीत अनुज्ञेय
शासकीय सेवेत कार्यरत असताना दिवंगत झाल्यास, त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय आहे. तसेच बेपत्ता झालेल्या शासकीय कर्मचार्‍यास सक्षम न्यायालयाने मयत घोषित केले असल्यास, त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास देखील अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय आहे.

कोणत्या पदावर अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय
गट-क व गट ड मधील ज्या ज्या संवर्गात सरळसेवा नियुक्तीचा मार्ग विहित केला आहेत्या सर्व संवर्गाच्या सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांवर अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय आहे. अनुकंपा नियुक्तीसाठी कुटुंबातील पात्र सदस्य कुटुंबातील सदस्य प्राधान्यक्रमानुसार अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र राहतील. नियुक्ती द्यावयाची त्याने ना-हरकत नमन्यामध्ये देणे आवश्यक आहे. तसेच वयोमर्यादा 18 वर्षे पूर्ण ते 45 वर्षे आहे.

ड संवर्गासाठी
गट-ड मधील अनेक संवर्गांची पदे ही संबंधित विभागांच्या सुधारीत आकृतिबंधामध्ये बाहय यंत्रणेमधून भरण्याबाबत निर्णय झाला असल्याने, अनुकंपा नियुक्तीसाठी पदे उपलब्ध होत नाहीत. यास्तव, या शासन निर्णयाच्या दिनांकापासून प्रथमतः 2 वर्षासाठी, गट-ड च्या सरळसेवा कोट्यातील प्रतिवर्षी रिक्त होणार्‍या 20% पदांवर अनुकंपा नियुक्ती देण्याची मर्यादा शिथिल करुन, गट-ड मधील जेवढी पदसंख्या मृत घोषित केली आहे त्या पदसंख्येच्या मर्यादेत अनुकंपा नियुक्तीसाठी पदे पुनर्जीवित करण्याचे अधिकार प्रशासकीय विभागास देण्यात येत आहेत. शासन निर्णयाच्या दिनांकापासून 2 वर्षानंतर गट-ड च्या प्रतिक्षासूचीतील उमेदवारांची संख्या विचारात घेवून मर्यादा शिथिल करण्याबाबत पुनर्विचार करण्यात येईल.

योजना कोणास लागू
– गट-अ ते गट-ड मधील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांस ही योजना लागू आहे.
– दिवंगत कर्मचार्‍याचा पती/पत्नी शासकीय सेवेत कार्यरत असतील तर त्या कुटुंबास अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय असणार नाही.
– दिनांक 31 डिसेंबर, 2001 नंतर तिसरे अपत्य झालेल्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबास अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय असणार नाही.
– प्रतिक्षासूचीवरील उमेदवाराचे नाव वयाची 45 वर्षे पूर्ण झाल्याने वगळल्यास कुटुंबातील अन्य व्यक्तीचे नाव समाविष्ट करता येणार आहे.

150 दिवसांत अनुकंपा नियुक्ती

  • राज्य सरकारकडून 150 दिवसांच्या उद्दिष्टपूर्ती कार्यक्रमानंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर मेगा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. राज्य शासनाने सर्व विभागांना 150 दिवसांचा उद्दिष्ट कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमांतर्गत आकृतीबंधातील सुधारणा, नियुक्ती नियमांचे अद्ययावतीकरण आणि अनुकंपा तत्त्वावरील 100% भरती पूर्ण करणे यांसारखी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत.
  • शासन निर्णयातील तरतूदीनुसार चालू निवडसूची वर्षातील अनुकंपा नियुक्तीची कार्यवाही दि.15 स्पटेंबर, 2025 पर्यंत पूर्ण करणे सुलभ व्हावे. यास्तव, अंदाजित वेळापत्रकानुसार कार्यवाही करण्याबाबत या परिपत्रकाद्वारे सूचित करण्यात येत आहे.
  • प्राथमिक बैठक- जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व प्राधिकारी यांची दि.23 जुलै, 2025 रोजी बैठक आयोजित करुन दि.15 ऑगस्ट, 2025 पर्यंत पूर्व तयारी करण्याबाबत सूचना द्याव्यात.
  • प्रतिक्षासूची अद्ययावत करणे- उमेदवारांचे नाव बदलणे तसेच प्रक्रियेतील अर्जासंदर्भात कार्यवाही करुन प्रतिक्षासूची अद्ययावत करणे.
  • गट बदलणे- उमेदवारांच्या विनंतीनुसार गट बदलण्याची कार्यवाही करणे. अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध रिक्त पदांची परिगणना करणे. गट-ड मध्ये अनुकंपा नियुक्तीसाठी पदे पुनर्जीवित करण्याचा प्रस्ताव प्रशासकीय विभागास पाठविणे.
  • पूर्व तयारी- नियुक्ती प्राधिकारी कार्यालयाने सर्व कार्यवाही 15 ऑगस्ट, 2025 पर्यंत पूर्ण करावी.
  • आढावा बैठक- जिल्हाधिकारी यांनी 18 ऑगस्ट, 2025 रोजी सर्व नियुक्ती प्राधिकारी यांची बैठक आयोजित करुन त्यांच्याकडून माहिती संकलित करणे
  • गट-ड ची पदे पुनर्जीवित करणे नियुक्ती- प्राधिकार्‍याने जिल्हाधिकार्‍यांच्या शिफारशीनुसार गट-ड ची पदे पुनर्जीवित करण्याचा प्रस्ताव प्रशासकीय विभागास पाठविणे.
  • मेळावा घेणे व शिफारस करणे- जिल्हाधिकारी यांनी 1 सप्टेंबर, 2025 रोजी उमेदवारांचा मेळावा आयोजित करुन उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करणे. गट-ड साठी मृत पदे पुनर्जीवित करणे- नियुक्ती प्राधिकार्‍याकडून प्राप्त प्रस्तावानुसार संबंधित प्रशासकीय विभागाने त्यांच्या अधिकारात गट-ड ची पदे 1 सप्टेंबर, 2025 पर्यंत पुनर्जीवित करण्याची कार्यवाही पूर्ण करावी. जिल्हाधिकारी कार्यालयाने गट- क च्या पदासाठी शिफारस केलेल्या उमेदवारांचे नियुक्ती आदेश निर्गमित करणे.

ताज्या बातम्या

Nashik News : आमदार राहुल ढिकलेंच्या पत्नीचे निधन; CM फडणवीसांनी घेतले...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati भाजपचे नाशिक पूर्व मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल ढिकले (MLA Rahul Dhikale) यांच्या पत्नी आदिती ढिकले (वय ४०) यांचे हृदयविकाराच्या...