नाशिक | प्रतिनिधी Nashik
प्रख्यात उद्योजक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेले व ‘देशदूत’चे संस्थापक देवकिसनजी सारडा यांचे शुक्रवारी (दि.20)निधन झाले. त्यांची शोकसभा आज रविवारी (दि.29) सार्वजनिक वाचनालयाच्या मु.शं.औरंगाबादकर सभागृहात सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
स्व.देवकिसनजी सारडा यांनी आपल्या जीवन काळात विविध सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार, राजकीय व पत्रकारिता क्षेत्रात मोलाचे योगदान दिले होते. या सर्वच क्षेत्रातील मान्यवरांच्या पुढाकाराने या शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या शोकसभेचे आयोजन सार्वजनिक वाचनालय नाशिक, नॅब महाराष्ट्र, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिक एज्युकेशन सोसायटी, प्रबोधिनी ट्रस्ट, मराठा विद्या प्रसारक मंडळ, वसंत व्याख्यानमाला, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ज्योती स्टोअर्स, लेखक तुमच्या भेटीला, अखिल भारतीय, महराष्ट्र व नाशिक जिल्हा माहेश्वरी समाज शाखा, वारकरी संप्रदाय, नावा, आयएमए, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, निमा, नाईस, आयमा, लघुउद्योग भारती, क्रेडाई, नाशिक सिटिझन फोरम, नाशिक बार असोसिएशन, आर्ट, लेखक सांस्कृतिक व साहित्यिक मंडळ व इतर संस्थांतर्फे करण्यात आले आहे.