Thursday, April 2, 2026
Homeनगरसंगमनेर येथे कन्फर्मेशन डीड नोंदणी पूर्ण करण्यासाठी तीन दिवसांचे विशेष शिबिर

संगमनेर येथे कन्फर्मेशन डीड नोंदणी पूर्ण करण्यासाठी तीन दिवसांचे विशेष शिबिर

नागपूर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर जिल्ह्याच्या संगमनेर येथील इंदिरानगर भागातील नागरिकांच्या कन्फर्मेशन डीड नोंदणी पूर्ण करण्यासाठी पुढील तीन दिवसांत विशेष शिबिर आयोजित करण्यात येईल. त्याचबरोबर ही नोंदणी करुन घेणे आवश्यक असताना ती न करणार्‍या सह दुय्यम निबंधकाची बदली करण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत सांगितले

- Advertisement -

विधान परिषद सदस्य सत्यजित तांबे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य भाई जगताप यांनी सहभाग घेतला. यासंदर्भात अधिक माहिती देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, याबाबत नोंदणी करुन घेण्याचे आदेश देण्यात आले असताना संबंधित सह दुय्यम निबंधकांनी प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले. या प्रकरणी जाणीवपूर्वक टाळाटाळ झाली आहे का, याची नोंदणी महानिरीक्षकांमार्फत चौकशी करण्यात येईल, तसेच चौकशी अहवाल आल्यानंतर यासंदर्भात पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

ताज्या बातम्या

ट्रम्प

Donald Trump: इराणवर सर्वात मोठा हल्ला कधी करणार? ट्रम्प यांनी डेडलाईन...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiमध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी २ एप्रिल रोजी अमेरिकेच्या नागरिकांना संबोधित केले....