Wednesday, June 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकाँग्रेसकडून ६९ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी

काँग्रेसकडून ६९ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

स्थानिक पातळीवरील पक्ष मजबुतीसाठी काँग्रेसने संघटनात्मक फेरबदल सुरु केले असून राज्यातील ६९ नव्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. काँग्रेसने दिल्लीतून पक्षाच्या नूतन जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर केली. या यादीत जुन्या चेहऱ्यांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करून काँग्रेसने संघटनेची घडी बसवण्याचा प्रयत्न चालवला आहे.

कोल्हापूर जिल्हा ग्रामीणच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे कायम ठेवण्यात आली आहे. एकट्या पुणे जिल्ह्यात पक्षाने चार जिल्हाध्यक्ष नेमले आहेत. पुणे पूर्वच्या जिल्हाध्यक्षपदी प्रशांत जगताप, पुणे पश्चिमच्या जिल्हाध्यक्षपदी दीप्ती चवधरी, पुणे ग्रामीण उत्तराच्या जिल्हाध्यक्षपदी कमलाकर सातव आणि पुणे ग्रामीण दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी लहु नवंगुणे यांची नियुक्ती झाली आहे.

ठाणे शहराध्यक्षपदावरून विक्रम चव्हाण यांना हटवून त्यांच्या जागी राहुल पिंगळे यांना संधी देण्यात आली आहे. तर ठाणे ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी चेतनसिंग पवार यांची नेमणूक करण्यात आली आहे. उल्हासनगर शहराध्यक्षपदी रोहित साळवे तर वसई-विरारच्या जिल्हाध्यक्षपदी कॅप्टन नीलेश पेंढारी यांची नियुक्ती झाली आहे.

काँग्रेसने अहिल्यानगर शहराध्यक्ष म्हणून दीप चव्हाण, अहिल्यानगर ग्रामीण उत्तरच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन गुजर तर अहिल्यानगर ग्रामीण दक्षिण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील यांची नेमणूक केली आहे. नाशिक शहर जिल्हाध्यक्षपदी नीलेश खैरे, नाशिक ग्रामीण उत्तरच्या जिल्हाध्यक्षपदी रमेश कहांडोले तर नाशिक ग्रामीण दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी भारत टेकेकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

काही जिल्ह्यांचे अन्य जिल्हाध्यक्ष पुढील प्रमाणे: भिवंडी शहर-अबीद खान मुनसफ, धुळे शहर-खान मोहम्मद सबीर, धुळे ग्रामीण-युवराज करंकाळ, जळगाव शहर-जमील शेख, जळगाव ग्रामीण पूर्व-धनंजय चौधरी, जळगाव ग्रामीण पश्चिम-अविनाश भालेराव, कल्याण शहर-नवीन सिंग, मीरा भाईंदर शहर-राकेश राजपुरोहित, नागपूर शहर-प्रफुल्ल गुडधे, नंदुरबार-दीपक पटेल, नवी मुंबई शहर-रामचंद्र दळवी, रायगड उत्तर-डॉ. मनीष पाटील, रायगड दक्षिण-राजेंद्र ठाकूर

ताज्या बातम्या

२५ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

0
येवला | प्रतिनिधी एका २५ वर्षीय विवाहितेने शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील वाघाळे येथे घडली. या प्रकरणी पती, सासरे आणि सासू...