Wednesday, July 3, 2024
Homeनाशिकमविआचा नाशिक शिक्षक मतदारसंघाचा तिढा सुटला; कॉंग्रेसच्या उमेदवाराची माघार

मविआचा नाशिक शिक्षक मतदारसंघाचा तिढा सुटला; कॉंग्रेसच्या उमेदवाराची माघार

ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदीप गुळवेंचा मार्ग सुकर

नाशिक | Nashik

- Advertisement -

महाविकास आघाडीमध्ये विधानपरिषदेच्या निवडणुकीवरून (Vidhan Parishad Election) बिघाड झाल्याच्या चर्चांनी कालपासून जोर धरला होता. मविआतील ठाकरेंची शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधरच्या जागेवरून तिढा निर्माण झाला होता. त्यानंतर अखेर आज या दोन्ही जागांवरील मविआचा तिढा सुटला आहे.

हे देखील वाचा : Nashik News : नाशिक शिक्षक मतदारसंघात ट्विस्ट; किशोर दराडे, संदीप गुळवे यांचा उमेदवारी अर्ज मागे

कोकण पदवीधरमधून ठाकरेंच्या शिवसेनेने आपला उमेदवार मागे घेत याठिकाणी कॉंग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. कोकण पदवीधरतून ठाकरेंच्या शिवसेनेकडून किशोर जैन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आज ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना कोकण पदवीधरची निवडणूक मविआतर्फे कॉंग्रेस लढविणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे कोकण पदवीधरचा तिढा सुटल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, नाशिक शिक्षक मतदारसंघावरून कॉंग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत पेच निर्माण झाला होता.

हे देखील वाचा : नाशिक शिक्षक मतदारसंघातून तीन उमेदवारी अर्ज दाखल

यानंतर अखेर या जागेचाही पेच सुटला आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघातून कॉंग्रेसने माघार घेतली असून याठिकाणी त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघातून कॉंग्रेसकडून दिलीप पाटील यांनी अर्ज भरला होता. तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून संदीप गुळवे यांनी अर्ज भरला होता. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र निर्माण झाले होते.

हे देखील वाचा : नाशिक शिक्षक मतदार संघ निवडणूक : शेवटच्या दिवशी 27 उमेदवारांनी 31 नामनिर्देशन अर्ज केले दाखल

दरम्यान, अखेर माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत तडजोड करण्यात आली आहे. त्यानंतर महाविकास आघाडीकडून आता नाशिक शिक्षक मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे संदीप गोपाळराव गुळवे हेच अधिकृत उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या