Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजRahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधींकडून शिवजयंतीच्या शुभेच्छा देतांना मोठी चूक;...

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधींकडून शिवजयंतीच्या शुभेच्छा देतांना मोठी चूक; ‘या’ शब्दाने नव्या वादाला तोंड

मुंबई | Mumbai

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची जयंती देशभरासह राज्यात उत्साहात साजरी केली जात आहे. शिवप्रेमींपासून राजकारण्यापर्यंत सर्वच स्तरातील लोकांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने शुभेच्छा देतांना मोठी चूक केली आहे. त्यामुळे राहुल गांधींवर विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे.

- Advertisement -

काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या एक्स (ट्विट)पोस्टवरुन शिवजयंतीच्या (Shiv Jayanti) शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी म्हटले की,”छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या धैर्याने आणि शौर्याने त्यांनी आम्हाला निर्भयतेने आणि पूर्ण समर्पणाने आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहील,” असं राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

त्यानंतर आता राहुल गांधींच्या या ट्विटवरून भाजपचे नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ” राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जयंती दिनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. महाराष्ट्रातील नागरिकांचा हा अपमान आहे, जयंतीच्या दिनी आदरांजली अर्पण करतात. राहुल गांधी हे महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत कळत-नकळत अपमान करत असतात. राहुल गांधी यांनी हे ट्वीट मागे घ्यावे”, अशी मागणी भातखळकर यांनी केली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी भाजप (BJP) आणि विरोधकांच्या आक्षेपाला प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की,”विरोधकांचा हा खेळ नवीन नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना, मानाचा मुजरा करताना My Humble Tribute असा शब्द प्रयोग केला. मी अभिवादन करतो, त्यांना सलाम करतो, असा भाव त्या ट्वीटचा आहे. भाषांतराचा झालेला हा घोळ आहे. पण, विरोधकांनी ‘ध’ चा ‘मा’ करून घाणरेडं राजकारण करू नये”, असे सपकाळ यांनी म्हटले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...