Thursday, April 23, 2026
HomeनगरAccident News : भरधाव कंटेनरच्या धडकेत 7 वाहनांचे नुकसान

Accident News : भरधाव कंटेनरच्या धडकेत 7 वाहनांचे नुकसान

शिक्षक जखमी || डीएसपी चौकातील घटना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

भरधाव कंटेनरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सात वाहनांना जोरदार धडक दिल्याने शिक्षक जखमी झाले असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना शहरातील डी. एस. पी. चौकात शनिवारी (13 सप्टेंबर) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

जखमी शिक्षक सागर दिनकर चिकने (वय 31 रा. स्टेट बँंक कॉलनी, तहसील कार्यालयाच्या पाठीमागे, शिरूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. जगप्रित कश्मिर सिंह (रा. व्ही. पी. ओ. चौधरीवाल, बाटाला, गुरदासपुर, पंजाब) असे गुन्हा दाखल झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. डी. एस. पी. चौकातील पंचवटी हॉटेलसमोर ही दुर्घटना घडली. फिर्यादी आपल्या (एमएच 12 एक्सएच 9638) या कारमधून जात होते. यावेळी समोरून भरधाव वेगाने आलेल्या (एचआर 55 एएल 8704) या कंटेनर चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून फिर्यादीच्या कारला समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत फिर्यादी जखमी झाले. तसेच, पंचवटी हॉटेलच्या समोर उभ्या असलेल्या इतर सहा वाहनांना या कंटनेरची धडक बसून त्यांचे मोठे नुकसान झाले. इतर काही चारचाकी वाहनांचेही किरकोळ नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

दरम्यान, घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. पाऊस सुरू असल्याने वाहतूक कोंडी झाली होती. माहिती मिळताच भिंगार कॅम्पचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. यासंदर्भात रविवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस अंमलदार इस्त्राईल पठाण करीत आहेत.

ताज्या बातम्या

संपादकीय : २३ एप्रिल २०२६ – ‘पहलगाम’ वर्षपूर्तीनंतर..

0
गर फिरदौस बर रुएं जमीं अस्त, हमीं अस्तो, हमीं अस्तो, हमीं अस्त.. अर्थात, पृथ्वीवर जर कुठे स्वर्ग असेल तर तो इथेच आहे, इथेच आहे,...