Wednesday, May 6, 2026
HomeनगरAccident News : कंटेनरची तीन वाहनांना धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी

Accident News : कंटेनरची तीन वाहनांना धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर- पुणे महामार्गावर चास (ता. अहिल्यानगर) शिवारात शुक्रवारी (16 जानेवारी) दुपारी भीषण अपघात घडला. भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवण्यात आलेल्या कंटेनरने समोरून येणार्‍या तीन वाहनांना जोरदार धडक दिल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. या अपघातात चार वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

या अपघातात शिवप्रसाद जनार्धन प्रसाद गौतम (वय 45, रा. पद्मनानगर, पाइपलाईन रस्ता, अहिल्यानगर) यांचा मृत्यू झाला, तर सुग्रीम माणिकराम यादव (रा. शिवाजीनगर, कल्याण रस्ता, अहिल्यानगर) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी दुपारी 12.50 वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर ते पुणे जाणार्‍या महामार्गावर काळे फॉर्मसमोर, चास शिवारात हा अपघात झाला.

विठ्ठल पंढरीनाथ वडारे (रा. डौल, ता. उद्गीर, जि. लातूर) हा त्याच्या ताब्यातील कंटेनर वाहन भरधाव वेगात व अविचाराने चालवत होता. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याने समोरील वाहनांना जोरदार धडक दिली. या प्रकरणी बाजीराव कान्हु घुंगार्डे (वय 65, रा. चास) यांच्या फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात कंटेनर चालक विठ्ठल वडारे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या