Thursday, June 18, 2026
HomeनगरVasant Deshmukh On Jayashree Thorat : संगमनेरात अखेर वादाचा भडका!

Vasant Deshmukh On Jayashree Thorat : संगमनेरात अखेर वादाचा भडका!

संगमनेर । शहर प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने विखे-थोरात गटातील संघर्षाचा अखेर भडका उडाला. धांदरफळ येथील विखेंच्या सभेतून महिलांचा अवमान झाल्याचा आरोप करत थोरात समर्थक कार्यकर्ते आक्रमक झाले असून तालुक्यात तीव्र पडसाद उमटले आहेत.

- Advertisement -

काही गाड्यांची चिखली परिसरात तोडफोड करण्यात आली असून एका गाडीची जाळपोळ झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, संतप्त महिलांनी धांदरफळ येथील सभास्थळी ठिय्या देत घोषणाबाजी केली. तालुका पोलीस स्थानकात कार्यकर्त्यांच्या जमावाने तणाव होता. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक मध्यरात्रीच्या सुमारास संगमनेरच्या दिशेने निघाल्याचे वृत्त होते.

शुक्रवारी सायंकाळी धांदरफळ बु येथे भाजपची युवा संकल्प सभा होती. डॉ. सुजय विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत असलेल्या या सभेत वसंतराव देशमुख यांची जीभ घसरली. देशमुख यांनी युवक काँग्रेस नेत्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली. विखे-थोरात कुटुंबातील तरुण पिढीत सध्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

बाप या शब्दावरून राजकारण पेटलेले असतानाच देशमुखांनी महिला नेत्यावर टीका करताना पातळी सोडल्याचा दावा केला जात आहे. देशमुख बोलत असताना मंचावर उपस्थित काही जाणत्या कार्यकर्त्यांनी त्यांना हटकले, मात्र भान सुटल्याचे त्यांना बऱ्याच वेळांनतर लक्षात आल्याचे म्हटले जात आहे. याचे पडसाद तालुक्यात उमटले.

सोशल मीडियातून ही वार्ता वेगाने पसरली. त्यानंतर शेकडो महिला, कार्यकर्ते धांदरफळ येथील सभास्थळी धावून गेले. धांदरफळ येथे विखेंच्या सभेनंतर स्थानिक थोरात समर्थक महिला आणि कार्यकर्त्यांनी, सभास्थळी ठिय्या देत देशमुख यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. देशमुखांच्या अटकेची मागणी करण्यात आली. सभा आटोपून परतणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांना संतापाचा फटका बसला. अकोले नाका परिसरातील पुलाखाली, खांडगाव दुध डेअरी समोर चिखली येथे १०:३० च्या सुमारास संतप्त कार्यकर्त्यांनी गाडीच्या काचा फोडल्याची घटना घडली. त्यानंतर एका गाडीची जाळपोळही झाली.

संगमनेर पालिकेच्या अग्निशमन बंबाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली, असे वृत्त होते. यावेळी काही कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचीही वार्ता होती, मात्र त्यास अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा तालुका पोलीस स्थानकाकडे वळवला. याठिकाणी ठिय्या आंदोलन करून डॉ. सुजय विखे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या अटकेची मागणी करण्यात आली.

वृत्ताच्या अखेरच्या अपडेटपर्यंत संतप्त कार्यकर्त्यांचा रास्तारोको सुरू होता. गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ झाल्याची माहिती मिळताच पोलीस दल तातडीने सावध झाले. नियंत्रणासाठी फौजफाटा तैनात करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी अनेकांची धरपकड सुरू केली आहे.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : ‘बनावट मतपत्रिका’ व्हायरल झाली अन् गिते...

0
नाशिक | Nashik नाशिक विधानपरिषद निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) एकूण ६१९ मतदारांपैकी ६१८ मतदारांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या नऊ मतदान केंद्रांवर (Voting Center) जाऊन मतदानाचा...