Saturday, July 4, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यात आतापर्यंत कोरोनाचे 46 बळी

पुण्यात आतापर्यंत कोरोनाचे 46 बळी

 सार्वमत
पुणे (प्रतिनिधी) – ससून रुग्णालयात बुधवारी रात्रीपासून ते गुरुवारी संध्यकाळी सहा वाजेपर्यंत पुण्यामध्ये चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये तीन महिला आणि अएका पुरुषाचा समावेश आहे. पुण्यातील कोरोनाबाधित आणि कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे त्यामुळे चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. गुरुवारी संध्याकाळपर्यंत पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृत रुग्णांची संख्या 46 झाली आहे. ससूनमध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये तिन्ही महिला आहेत. शिवाजीनगर वाकडेवाडी येथील 65 वर्षीय महिलेला 3 एप्रिल रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तिला कोरोनाची लागण झाली होती. त्याशिवाय तिला रक्तदाबही होता. बुधवारी रात्री उशिरा तिचा मृत्यू झाला. गुलटेकडी येथील एका 55 वर्षे कोरोनाबाधित महिलेचा बुधवारी मृत्यू झाला. तिच्यावर 14 एप्रिल पासून उपचार सुरु होते. या महिलेला उच्च रक्तदाब आणि हृदयविकार होता. गंज पेठेतील 54 वर्षांच्या महिलेवर 13 एप्रिलपासून उपचार सुरू होते. तिला मधुमेहाबरोबरच इतरही आजार होते. तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. तिचाही बुधवारी मृत्यू झाला. कोंढव्यातील 47 वर्षांच्या एका महिलेवर 9 एप्रिल पासून उपचार सुरू होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तिला मधुमेह तसंच किडनीचा विकार होता. तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 518 झाली आहे. तथापी क्टीव रुग्ण 404 आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. आजपर्यत विभागामध्ये एकुण 6 हजार 781 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 6 हजार 383 चा अहवाल प्राप्त आहे. तर 398 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 5 हजार 846 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 518 नमुन्यांचा अहवाल पॉजिटिव्ह आहे. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकून 120 फ्ल्यू क्लिनिक स्थापन करण्यात आले असून त्यापैकी पुणे महानगरपालिका क्षेत्रात 73 क्लिनिक आहेत तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात 47 क्लिनिक आहेत. नागरिकांनी ताप, सर्दी यासारखी लक्षणे दिसल्यास तात्काळ फ्ल्यू क्लिनिकमध्ये जावून उपचार घ्यावेत, असे आवाहन डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे. आजपर्यंत विभागामधील 35 लाख 59 हजार 992 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 1 कोटी 36 लाख 54 हजार 248 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 794 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे. विभागात एकूण 5 हजार 971 नागरिकांना निरिक्षणाखाली होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यात 4 हजार 11, सातारा जिल्ह्यात 325, सोलापूर जिल्ह्यात 744, सांगली जिल्ह्यात 888 आणि कोल्हापूर जिल्ह्यात 03 नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. विभागात एकूण 1 हजार 969 नागरिकांना निरिक्षणाखाली संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यात 204 , सातारा जिल्ह्यात 116, सोलापूर जिल्ह्यात 421, सांगली जिल्ह्यात 62 आणि कोल्हापूर जिल्ह्यात 1166 नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.

कोरोनाग्रस्त मृतावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी घेणार मुस्लिम मंच
पुण्यात मूलनिवासी मुस्लिम मंचाने कोरोनाफबाधित मृत व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. कुठल्याही धर्मातील कोरोनाफग्रस्त मृतावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी घेण्यास मुस्लिम मंच तयार आहे.
पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी कोरोनाफग्रस्त मृताचे पार्थिव कुटुंबाकडे न सोपवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे ही जबाबदारी कोणाकडे जाणार, हा प्रश्न होता. या मंचाच्या माध्यमातून प्रत्येक समाजातील मृतांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत, अशी माहिती मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इमानदार यांनी दिली आहे.
मूलनिवासी मुस्लिम मंचाकडून पुणे महापालिकेशी या संबंधी पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्याची परवानगी मिळाल्यानंतर आतापर्यंत 4 मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. कोरोनाफबाधित मृत व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक पुढे येत नसल्याची बाब गेल्या काही दिवसात समोर येत आहे. कुठे संपूर्ण कुटुंबातील सदस्यांनाच कोरोनाफची लागण झाल्यामुळे त्यांना अंत्यसंस्कार करता येत नाहीत, तर कुठे संसर्गाच्या भीतीपोटी कोरोनाफबाधित मयत व्यक्तीचे कुटुंबीय अंत्यसंस्कार करण्यास पुढे येत नाहीत.

- Advertisement -

पोलिसांनी घेतले 150 लोकांना ताब्यात
पुण्यातील काही भागात कोरोनाचे जास्त रुग्ण आढळल्यामुळे हे भाग सील करण्यात आले आहेत. या भागातील पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. किराणा साहित्य, भाजीपाला आणि इतर अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी अशा भागात 10 ते 12 या दोन तासांसाठी शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, काही नागरिक याचा गैरफायदा घेताना दिसत आहेत. आपला परिसर सोडून इतर परिसरात फिरताना काही नागरिक आढळले आहेत. यावर कारवाई करत स्वारगेट पोलिसांनी गुरूवारी सकाळपासून 150 लोकांना ताब्यात घेतले. आणि त्यांची वाहने जप्त केली व त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी त्यांना दोन ते तीन तास बसवून ठेवले आणि त्यानंतर पायी चालत घरी पाठवले. विनाकारण फिरणारे हे नागरिक स्वतःसह पोलिसांचाही जीव धोक्यात टाकत आहेत. त्यांची ही वर्तणूक चुकीची असल्याची जाणीव करून देण्यासाठी त्यांच्यावर ही कारवाई केली जात आहे, अशी माहिती स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मा नाईकवडी यांनी दिली.
दरम्यान, संचारबंदीचे उल्लंघन करत मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या 100 हून अधिक नागरिकांवर पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल केले.पुण्यात संचारबंदीचे उल्लंघन, मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या 100 हून अधिक जणांवर गुन्हे दाखलबिबवेवाडी, कोंढवा, हडपसर, चतु:शृंगी, दत्तवाडी या पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. या सर्व नागरिकांना शिक्षा म्हणून भर रस्त्यात योगा करण्यास भाग पाडले. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील अनेक भाग सील करण्यात आले आहेत. परंतु असे असतानाही मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणार्‍या नागरिकांवर पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. एकीकडे शहराच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला असताना स्वतःच्या आरोग्यासाठी मॉर्निग वॉक निघालेल्या या महाभागांकडून पोलिसांनी चक्क व्यायामच करून घेतला.

आजाराचा बनाव करून रजेवर गेलेल्या कर्मचार्यांना सेवामुक्तीचा इशारा
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आजाराचा बनाव करुन रजेवर गेलेल्या पुणे मनपा अधिकारी आणि कर्मचार्‍यांना सेवा मुक्तीचा इशारा अतिरिक्त आयुक्तांनी दिला आहे. आयुक्तांच्या या आदेशामुळे पुणे महानगरपालिकेतील कर्मचार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता पुणे महानगरपालिकेतील काही अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी आरोग्याच्या तक्रारी करुन वैद्यकीय रजेवर गेले आहेत. मात्र अशा अधिकारी-कर्मचार्‍यांची खातरजमा करण्यात येणार आहे.जे अधिकारी-कर्माचारी रजेवर रुजू झाल्यास त्यांच्याकडून वैद्यकीय कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. माञ कोणी अपात्र ठरल्यास अशा कर्मचार्‍याला सेवामुक्त करण्याचा इशारा अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिला आहे.
काही मनपा अधिकारी आणि कर्मचारी आरोग्याची कारणं सांगून रजा घेत आहेत. तर काहीजण रजेवर गेल्याचं प्रशासनाला आढळून आलं आहे. त्यामुळे अशा कामचुकार कर्मचार्‍यांना तंबी देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...