सार्वमत
पुणे (प्रतिनिधी) – पुण्यात आज सात करोनाबाधीत रुग्णांचा मृत्य झाला, तर दिवसभरात करोनाचे 99 नवे रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यात आतापर्यंत एकूण 101 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनाचा संसर्ग झालेले 55 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
- Advertisement -
पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालयात सध्या एकूण 451 करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर त्यातील 75 अत्यवस्थ आहेत. 17 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यात एकूण करोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 1818 झाली आहे. तर पुण्यातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 1283 आहे.




