Sunday, July 5, 2026
Homeमहाराष्ट्रकरोनामुक्त झालेल्यांचे स्वागत करताना गर्दी : राष्ट्रवादीच्या नगरसेविकेवर गुन्हा

करोनामुक्त झालेल्यांचे स्वागत करताना गर्दी : राष्ट्रवादीच्या नगरसेविकेवर गुन्हा

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहरात करोनामुक्त झालेल्या नर्स आणि त्यांच्या पतीचं जंगी स्वागत करताना गर्दी जमावल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका मंगला कदम यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ससून रुग्णालयातून डिस्चार्ज झालेल्या दाम्पत्याचं स्वागत करताना फिजीकल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

- Advertisement -

नगरसेविका मंगला कदम यांनी या स्वागतच्यावेळी ढोल-ताशा आणि पुष्पवृष्टी करताना मोठ्या प्रमाणात गर्दी जमवली. यामुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका तयार झाल्याने प्रशासनाने कठोर पावलं उचलली. निगडी पोलिसांनी नगरसेविका मंगला कदम यांच्यासह चार आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी गर्दी न करण्याचे आणि शारिरीक अंतर पाळण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांकडून करण्यात येत आहे.

तसे आदेश देखील दिले गेले आहेत. मात्र, पिंपरी चिंचवडमध्ये करोनामुक्त झालेल्या त्याफ नर्स आणि त्यांच्या पतीचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले स्थानिक नगरसेविका आणि माजी महापौर मंगला कदम यांच्याकडून ढोल-ताशांच्या गजरात या दाम्पत्याचे स्वागत करण्यात आले यावेळी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी झाली होती काही वेळाने या गर्दीचे व्हिडिओ सोशल मीडियावर देखील वायरल झाली याच प्रकरणाची गंभीर दखल घेत निगडी पोलिसांनी माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका मंगला कदम यांच्यासह चार जणांवर निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचे वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) शनिवारी डाळिंबाला सर्वाधिक 210 रुपये किलोला भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 449 कॅरेटची आवक झाली. डाळिंब...