दिल्ली | Delhi
भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाच्या आकडेवारीत चढ-उतार दिसत आहे. यामुळे करोनाचे संकट अद्याप देशभर कायम आहे. गेल्या सलग सहा दिवसांपासून ४० हजाराहून अधिक करोना रुग्ण आढळून येत आहेत.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात करोनाच्या ४० हजार १३४ नव्या रुग्णांची भर पडली असून ४२२ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण लोकांची संख्या आता ४ लाख २४ हजार ७७३ एवढी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात ३६ हजार ९४६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. देशात करोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ कोटी ८ लाख ५७ हजार ४६७ झाली आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी १६ लाख ९५ हजार ९५८ करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर देशात सध्या ४ लाख १३ हजार ७१८ उपचाराधीन रुग्ण आहेत.
दरम्यान भारतात ऑगस्ट (August) महिन्यात करोनाची तिसरी लाट (Coronavirus Third Wave) येईल आणि ऑक्टोबर (October) महिन्यात ती उच्चांक गाठेल असे एका रिपोर्टमधून समोर आले आहे. या लाटेत दिवसाला १ लाख रुग्ण आढळून येतील किंवा दीड लाखांहून अधिक नागरिक संक्रमित होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. हैदराबाद आणि कानपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मध्ये मथुकुमल्ली विद्यासागर आणि मनींद्र अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संशोधनातून समोर आलेल्या अहवालात असे म्हटले आहे. यात केरळ आणि महाराष्ट्राला सर्वाधिक धोका असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्रातील स्थिती काय? (Maharashtra corona update)
महाराष्ट्रात काल दिवसभरात करोनाबाधितांची संख्या करोनामुक्त झालेल्या रुग्णांपेक्षा अधिक आहे. राज्यात काल ६ हजार ४७९ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ४ हजार ११० रुग्ण करोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६० लाख ९४ हजार ८९६ रुग्णांनी करोनावर मात केल्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५९ टक्के झाले आहे. काल राज्यात करोनामुळे १५७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.१ टक्के झाला आहे.




