पुणे –
पुणे शहरात आज दिवसभरात 779 नवे करोनाबाधित आढळले असून
33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 42 हजार 915 झाली आहे. आज अखेर 3 हजार 406 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्या 1 हजार 105 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर 1 लाख 22 हजार 281 रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये आज दिवसभरात 554 नव्या करोनाबाधितांची नोंद झाली असून, 15 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 9599 जण आज करोनातून बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 76 हजार 633 वर पोहचली असून यापैकी 63 हजार 580 जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 4 हजार 676 आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.




