Thursday, July 2, 2026
Homeदेश विदेशदेशात पहिल्यांदा अक्टिव्ह केसेसपेक्षा करोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक

देशात पहिल्यांदा अक्टिव्ह केसेसपेक्षा करोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक

सार्वमत

नवी दिल्ली – देशात करोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना दिलासादायक माहिती समोर आली आहे. देशातील करोनाबाधित रुग्णांची बरे होण्याची संख्या सध्याच्या अ‍ॅक्टिव्ह केसेसपेक्षा अधिक झाली आहे. करोनाचा प्रभाव देशभरात वाढत असताना पहिल्यांदा असं घटलं आहे. याचा अर्थ असा की देशभरातील करोनाबाधितांचा रिकव्हरी रेट (करोनामुक्त होण्याचा) 50 टक्क्यांहून अधिक झाला आहे. त्यामुळे करोनाच्या चिंताग्रस्त वातावरणात ही आकडेवारी सकारात्मक आहे.

- Advertisement -

देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या 2 लाख 76 हजार 583 झाली आहे. यामध्ये 1 लाख 33 हजार 632 रुग्णांवर सध्या उपचार (अ‍ॅक्टिव्ह केस) सुरु आहेत. तर एकूण 7745 करोनाबाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे एकूण 1 लाख 35 हजार 205 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जारी केली आहे.
बुधवारी सकाळपर्यंत गेल्या 24 तासात करोना व्हायरसच्या जवळपास 10 हजार रुग्णांची नोंद झाली आहे. सलग सहाव्या दिवशी देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या 9500 हून अधिक आहे. तर गेल्या 24 तासात एकूण 279 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra News : साकीनाका दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai साकीनाका येथील खैरानी रोडवर घडलेल्या दुर्घटनेचे पडसाद गुरुवारी विधानसभेत (Vidhansabha) उमटले. या दुर्घटनेत उघड्या गटारात पडून ६० वर्षीय अस्लम इसाक...