सार्वमत
पुणे (प्रतिनिधी) – करोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होताना दिसतो आहे. पुण्यात आज दिवसभरात 13 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला तर दिवसभरात 181 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. दरम्यान, दिवसभरात 166 करोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले.आतापर्यंत पुण्यात करोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या 8062 इतकी झाली आहे. त्यापैकी बरे होऊन घरी सोडलेल्या एकूण रुग्णांची संख्या 5185 झाली आहे. पुण्यातील सध्याची अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 2486 इतकी आहे. सध्या एकूण 204 गंभीर रुग्ण असून 43 जणांवर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत.पुण्यात आतापर्यंत करोनाने मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 43 झाली आहे. आज दिवसभरात एकूण 2108 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या.




