Thursday, September 3, 2026
Homeदेश विदेशकरोना संक्रमित तरुणीवर अ‍ॅम्ब्युलन्स चालकाचा बलात्कार

करोना संक्रमित तरुणीवर अ‍ॅम्ब्युलन्स चालकाचा बलात्कार

नवी दिल्ली | New Delhi –

- Advertisement -

केरळात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहेे. करोना संक्रमित तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिकेच्या चालकानेच

तिच्यावर बलात्कार केला आहे. एका वृत्तानुसार, केरळच्या पटनमिठ्ठा या भागात ही घटना घडली आहे. ही तरुणी संक्रमित झाल्यामुळे तिच्यासह अन्य एका संक्रमित रुग्णाला घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका आली होती.

या रुग्णवाहिकेच्या चालकाने आधी त्या दुसर्‍या रुग्णाला एका सेंटरमध्ये सोडलं आणि मग तो ती रुग्णवाहिका घेऊन एका निर्जन स्थळी गेला. तिथे या चालकाने तरुणीवर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर त्याने तिला कोविड केअर सेंटरमध्ये सोडलं. या घटनेनंतर तरुणीने पोलिसात तक्रार केली. त्या तक्रारीवरून या रुग्णवाहिकेच्या चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, केरळमध्ये करोना संक्रमित रुग्णांचा आकडा वाढत असून एकाच दिवशी तब्बल 2655 इतक्या संख्येने रुग्ण वाढले आहेत. सध्या या राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 84 हजार 759 इतकी असून गेल्या 24 तासात 11 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे आजवर करोनाने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 337 इतकी झाली आहे.

ताज्या बातम्या

रोहित

Vidyanand Bapat: पिसाटलेल्या मानसिकतेचे लक्षण…विद्यानंद बापटांना मारहाणीवर रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

0
पुणे | Puneपुण्यात डीजेबंदी आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर टिळक रस्त्यावर झालेल्या अचानक हल्ल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर...