Monday, September 7, 2026
Homeक्राईमNashik Crime News: फुटबॉल बेटिंगवर स्ट्राइक; सायबर पेट्रोलिंगने उघड केलं दीड कोटीचं...

Nashik Crime News: फुटबॉल बेटिंगवर स्ट्राइक; सायबर पेट्रोलिंगने उघड केलं दीड कोटीचं बेटिंग रॅकेट

नाशिक | प्रतिनिधी
सध्या सुरू असलेल्या फिफा फुटबॉल वर्ल्ड कपच्या फिव्हरचा गैरफायदा घेत सुरू असलेल्या एका आंतरराज्यीय ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा नाशिक शहर सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांच्या तांत्रिक सायबर पेट्रोलिंगदरम्यान हा प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांनी थेट वडनेरदुमाला ते कळवणपर्यंत माग काढत हे हायटेक बेटिंग सेंटर उद्ध्वस्त केले. प्राथमिक तपासात तब्बल दीड १ कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुजरातच्या मुख्य बुकीसह पाच जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

सायबर पोलीस ठाण्याचे अमलदार भूषण देशमुख आणि दर्शन सोनवणे हे सोशल मीडिया आणि इंटरनेटवर सायबर पेट्रोलिंग करत असताना त्यांना वडनेरदुमाला परिसराशी संबंधित काही संशयास्पद ऑनलाईन लिंक्स आणि आयपी ड्रेस मिळून आले. या तांत्रिक धाग्यांचा अत्यंत गोपनीयतेने माग काढत सायबर पोलिसांनी थेट वडनेर आंतरराज्यीय दुमाला ते कळवणमधील गंगा निवास या ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात बुकींचे नेटवर्क उघड झाले. संशयितांनी ग्राहकांकडून पैसे स्वीकारण्यासाठी क्यूआर कोडचा वापर केला होता.

Raj Thackeray: यांच्या वर्दीचा खाकी रंग पोलीस दलाचा आहे असा आमचा समज होता…; राज ठाकरेंचा आयपीएस विश्वास नांगरे पाटलांवर निशाणा

रेड्डी ४१० ब्रँच, क्रिकबेट ९९, ११एक्स, प्ले कसिनो या बेकायदेशीर वेबसाइट्सच्या माध्यमातून सट्टा चालवला जात होता. ग्राहकांनी क्यूआर कोड स्कॅन करून पैसे पाठवल्यानंतर, ते पैसे पकडले जाऊ नयेत म्हणून वेगवेगळ्या ५४ बँक खात्यांमध्ये फिरवले जायचे आणि त्यानंतर एटीएमद्वारे काढून घेतले जात. आतापर्यंत सुमारे दीड कोटींचे ट्रान्झेक्शन पोलिसांच्या रडारवर आले आहे. घटनास्थळावरून चार लॅपटॉप, १८ मोबाईल, ५४ पासबुक, चार राऊटर, २५ एटीएम कार्ड आणि २६ सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. आरोपी केवळ कमिशनवर नोकरी करत होते की या मास्टरमाइंड मागे आणखी मोठे मासे आहेत, याचा तपास सायबर पोलिस करत आहेत.

गुजरातच्या बुकीसह ५ जण गजाआड
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त संदीप मिटके, सायबरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. अटक केलेल्यांमध्ये गुजरातच्या साबरकंठा येथील मुख्य बुकी पठाण अरबाज खान फरीद खान (२३) याच्यासह अरबाज शब्बीर शेख (२७, रा. देवळाली), आसीफ जाफर हुसेन (४२, रा. लासलगाव), पंकज नामदेव आहेर (३४, रा. पाथर्डीरोड, नाशिक) आणि सागर रमेश कांबळे (३८, रा. कोल्हापूर) यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘बॉस’ने सांगितलं म्हणजे विषय संपला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील नेत्यामध्ये माझ्या नावावर सहमती होत नसेल आणि वाद होत असतील, तर मला जिल्हा बँकेच्या पदावर बसण्याची कोणतीही इच्छा नाही, असे स्पष्ट...