Tuesday, June 17, 2025
Homeब्रेकिंग न्यूजएसटी महामंडळातंर्गत पाच प्रादेशिक विभागांची निर्मिती- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

एसटी महामंडळातंर्गत पाच प्रादेशिक विभागांची निर्मिती- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

स्थानिक पातळीवर वाहतुकीचे नियोजन, जादा वाहतुकीचा निर्णय घेणे तसेच अधिकारांचे विकेंद्रीकरण आणि समन्वयासाठी कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळात मुंबई, नाशिक, नागपूर, पुणे आणि अमरावती अशा पाच प्रादेशिक विभागांची निर्मिती करण्यात आली आहे. पुढील काही दिवसात हे प्रादेशिक विभाग स्वतंत्रपणे आपले कार्यालय सुरू करतील, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी दिली.

- Advertisement -

एसटी महामंडळाच्या नियोजन आणि पणन खाते अंतर्गत कार्यरत असलेल्या विविध संनियंत्रण समित्यांचे कार्यालय ६ डिसेंबर २०१६ पासून बंद करण्यात आले होते. परंतु, प्रताप सरनाईक यांनी कर्नाटक राज्याच्या दौऱ्यानंतर तेथील महामंडळाच्या विकेंद्रीकरणाची संकल्पना उचलून धरली. त्यामुळे आकार आणि प्रशासकीयदृष्ट्या कर्नाटक महामंडळाच्या दुप्पट असणाऱ्या महाराष्ट्र एसटी महामंडळाचे देखील किमान पाच प्रादेशिक विभागात विभाजन करावे, अशी संकल्पना त्यांनी मांडली होती.

त्यानुसार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. तालुकास्तरावर आगार, जिल्हास्तरावर विभागीय कार्यालय आणि राज्य स्तरावर मध्यवर्ती कार्यालय अशी त्रिस्तरीय रचना सध्या कार्यरत आहे. परंतु राज्य सरकारच्या महसूल विभागाप्रमाणे सहा प्रशासकीय विभागांचा या त्रिस्तरीय रचनेत समावेश नव्हता. त्यामुळे मध्यवर्ती कार्यालयातून थेट विभागीय कार्यालयाशी संवाद साधणे भौगोलिकदृष्ट्या शक्य होत नव्हते. त्यामुळे प्रशासकीय दिरंगाईमुळे त्याचा विपरीत परिणाम एसटीच्या महसूलावर होत होता. या सर्वांची दखल घेऊन ‘नियंत्रण, नियोजन आणि समन्वयाच्या’ हेतूने महामंळातंर्गत पाच प्रादेशिक विभाग करण्याचा निर्णय घेतल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

प्रत्येक समितीसाठी आवश्यक तेवढ्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, त्या-त्या भागातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि वेळेत सेवा मिळण्यासाठी सर्व प्रकारचे नियोजन राबवले जाणार आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने योग्य ती अंमलबजावणी सुरु करण्याचे निर्देश डॉ. कुसेकर यांनी दिले आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : बदलीसाठी बोगस ‘आंधळे, पांगळे’ होणार्‍यांवर आता फौजदारी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातंर्गत बदली प्रक्रियेतून सुटका व्हावी अथवा सोय व्हावी, यासाठी बोगस अपंगत्व प्रमाणपत्र, घटस्फोट, परितक्त्या असण्याची बोगस कागदपत्रे रंगवणार्‍या प्राथमिक शिक्षकांविरोधात आता...