नाशिक | Nashik
भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातला (Ashok Kharat) तिसऱ्या गुन्ह्यात काल (बुधवारी) एसआयटीने अटक केली होती. यानंतर आज (गुरुवारी) त्याला या गुन्ह्यात नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याआधीच्या गुन्ह्यात खरातला सात दिवसांची पोलीस कोठडी झाली होती.
शहरातील सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) भोंदू अशोक खरातविरुद्ध एका सात महिन्यांच्या गरोदर महिलेवर लैंगिक अत्याचार (Rape) केल्याचा आरोप असून, त्याचा काल (बुधवारी) या गुन्ह्यात एसआयटीने (SIT) ताबा घेतला होता. त्यानंतर या प्रकरणात आज त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली.
दरम्यान, आज (गुरुवारी) अशोक खरातला व्हीसीद्वारे हजर करण्यात आले होते. न्यायाधीश श्रीमती बी.एन.इचपुराणी यांच्या न्यायालयात (Court) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान तपास अधिकारी अमोल भारती यांनी गुन्ह्याचे स्वरूप स्पष्ट करत फिर्याद वाचून दाखवली. या फिर्यादीत प्रसूती सुरळीत व्हावी आणि मुलगाच होईल, असे आमिष दाखवत त्याने महिलेवर अत्याचार केल्याचे नमूद आहे.





