Thursday, March 13, 2025
Homeक्राईमकोयता, गज व दांड्याने मारहाण; 12 जणांवर गुन्हा दाखल

कोयता, गज व दांड्याने मारहाण; 12 जणांवर गुन्हा दाखल

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

दुकानासमोर हातगाडी लावल्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून मारहाण केल्याची घटना नेवासा येथे घडली. याबाबत दाखल फिर्यादीवरुन 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत इमरान आतारखान पठाण (वय 47) धंदा- ट्रान्सपोर्ट, रा. जुनी बाजारपेठ, नेवासा खुर्द यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, आमचे नगरपंचायत चौकाकडे जाणारे रोडचे कडेला सज्जुभाई ट्रान्सपोर्टचे ऑफिस आहे. 8 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मी, पुतण्या तौसीफ, चुलतभाऊ अब्रारखान असे आम्ही दुकानावर बसलेलो असताना माझे दुकानासमोर खाजा बागवान हा त्याचेकडील केळी विक्रीसाठीची हातगाडी घेवून आमचे दुकानासमोर लावू लागला.

- Advertisement -

त्यावेळी आम्ही त्याला हातगाडी आमचे दुकानासमोर लावू नको असे समजावून सांगितले असता त्याने आम्हाला आरडा-ओरडा करुन शिवीगाळ केली. आरडा-ओरड झाल्याने तिथे आवेश बागवान, तय्यब बागवान, वसीम गनी बागवान (जामा मज्जीद जवळचा), शोएब बागवान, सलमान बागवान, जाफर बागवान, जब्बार पिंजारी, नवाब गफूर बागवान, समीर खाजा बागवान, अफताब हतीफ बागवाण व फारुख हमीद बागवान हे सर्व 12 जण तिथे जमा झाले. त्यांचेकडे हातामध्ये लोखंडी गज, छत्रीचा दांडा, नारळ तोडण्याचा कोयता, दगड, खोर्‍याचा दांडा असल्याचे मी पाहीले. मी त्यांना हातगाडी इथे लावू नका आमचा ट्रान्सपोर्टचा खूप जुना गाळा आहे. असे समजावून सांगितल्याने त्यांनी आम्ही रस्त्यावर गाडी लावत आहोत. तुमच्या जागेवर नाही असे म्हणून आवेश बागवान, वसीम गणी बागवान यांनी मला तोंडात चापटीने व तय्यब बागवान याने पाठीत खोर्‍याचे दांड्याने मारहाण करुन जखमी केले.

तसेच पुतण्या तौसीफखान तौफीकखान पठाण याचे डोक्यात व कपाळावर समीर खाजा बागवान याने छत्रीचे दांडक्याने मारहाण करुन त्यास जखमी केले व चुलत भाऊ अब्रारखान रहमदखान पठाण यास खाजा बागवान याने डोक्यात नारळ तोडण्याचे कोयत्याने, पाठीवर, हातावर व पायावर शोएब बागवान, सलमान बागवान, जब्बार पिंजारी यांनी लोखंडी गजाने व दगडाने मारहाण करुन जखमी केले आहे.व इतरांनी शिवीगाळ करुन आमची गाडी इथेच लावणार परत जर आम्हाला कुणी काही बोलले तर तुम्हाला जीवे ठार मारून टाकू अशी धमकी दिली. त्यावेळी तिथे बरकतखान शहजादे पठाण, जावेदखान सलाबतखान पठाण, फैजलखान बरकतखान पठाण असे तिथे आम्हाला सोडविण्यासाठी आले परंतु वरील सर्वांनी आम्हाला शिवीगाळ करतच होते. त्यावेळी पोलीस स्टेशनची गाडी आल्याने ते सर्व तेथून पळून गेले. या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...