Wednesday, December 4, 2024
Homeक्राईमदोन लाखांचे गोमांस पकडले

दोन लाखांचे गोमांस पकडले

एक जण ताब्यात

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जुन्या जिल्हाधिकारी कार्यालया जवळ असलेल्या काळी मस्जिद चौकात कोतवाली पोलिसांनी छापा टाकून एक लाख 90 हजार रूपये किमतीचे 950 किलो गोमांस व चार लाखाची पिकअप (एमएच 04 एलई 0497) असा पाच लाख 90 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. शुक्रवारी (18 ऑक्टोबर) रात्री 12:10 वाजेच्या सुमारास ही कारवाई केली.

- Advertisement -

या प्रकरणी पोलीस अंमलदार संभाजी कोतकर यांच्या फिर्यादीवरून शादाब गुलाम रसुल कुरेशी (वय 27 रा. कुरेशी मोहल्ला, झेंडीगेट) याच्याविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या जिल्हाधिकारी कार्यालया जवळ असलेल्या काळी मस्जिद चौकात काही इसम गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करण्यासाठी पिकअप मधून भरून नेले जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती.

त्यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. उपनिरीक्षक पाटील यांनी पोलीस अंमलदारांना सोबत घेत शुक्रवारी रात्री 12:10 वाजेच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला असता 950 किलो गोमांस व एक पिकअप मिळून आला. शादाब गुलाम रसुल कुरेशी याला ताब्यात घेत त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार इनामदार करत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या