Saturday, July 4, 2026
Homeक्राईमCrime News : दिव्यांग मुलीवर वृध्दाकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न; प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांना फोनाफानी?

Crime News : दिव्यांग मुलीवर वृध्दाकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न; प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांना फोनाफानी?

चाळीसगाव | मनोहर कांडेकर | Chalisagon

तालुक्यातील वडाळा-वडाळी येथे एका दिव्यांग मुलीवर (Disabled Girl) हिगोंणे येथील ६५ वर्षीय वृध्दाकडून आज (सोमवारी) दुपारी २ वाजेच्या दरम्यान अप्रिसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. घटनास्थळी ग्रामीण पोलीसातील (Rural Police) कर्मचार्‍यांनी धाव घेतली असून, वृध्दाला ताब्यात घेऊन ग्रामीण पोलीस स्टेशनला आणण्यात आले आहे. परंतु, हे प्रकरण दाबादाबीसाठी फोनाफानी सुरु झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

- Advertisement -

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गावात आज एक कार्यक्रम असल्यामुळेे मुलीच्या घरातील मंडळी कार्यक्रमासाठी गेली होती. हिच संधीसाधून हिगोंणे (Hingone) येथील वृध्दांने दिव्यांग मुलीच्या घरात प्रवेश करुन, तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. परंतु वेळीच मुलीचा भाऊ त्याठिकाणी दाखल झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला. यानंतर ग्रामस्थांनी या वृध्दाला चांगला चोप देत पोलिसाना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन वृध्दाला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, त्याच्यावर कारवाईसाठी पुढील तजवीज सुरु आहे. परंतु सदर प्रकरण दाबादाबीसाठी काहींकडून पुढाकार घेतला जात असून, त्यासाठी फोनाफानी देखील सुरु असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. तसेच गुन्हा (Case) दाखल करुन न्याय देण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. तर प्राप्त माहितीनूसार मुलीच्या घरच्यांना देखील गुन्हां दाखल करु नका? म्हणून दबाव देखील आणला जात असल्याची चर्चा आहे.

ताज्या बातम्या

Nashik Fraud News : पदाचे आमिष दाखवून आठ लाखांची फसवणूक ;...

0
नाशिक | Nashik नेहमीच संशयास्पद कारभाराच्या आरोपांमुळे चर्चेत असणाऱ्या दिंडोरी रोडवरील (Dindori Road) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून (एमयूएचएस) फसवणुकीचा कारनामा समोर आला आहे. विद्यापीठात क्लर्क...