Friday, June 5, 2026
Homeक्राईमAshok Kharat Case : भोंदूचा विळखा - भाग १ : खरातला भक्तांनी...

Ashok Kharat Case : भोंदूचा विळखा – भाग १ : खरातला भक्तांनी दाखवला कमाईचा ‘नवा’ मार्ग; बडे उद्योग घराणेही प्रेमात

सिन्नर | विलास पाटील | Nashik

सन २००० च्या दशकात खरातचे साम्राज्य मर्यादित होते. नाशिक-अहिल्यानगर जिल्ह्याच्या (Nashik-Ahilyanagar District) बाहेर त्याचे फारसे भक्तगण नव्हते. नर्मदा परिक्रमा करता करता त्याला अचानक दोन नवे भक्त मिळाले. नव्हे त्यांच्या रूपाने परिसच सापडला आणि त्यातूनच त्याचे साम्राज्य पुणे, मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागात वाढत गेल्याची चर्चा त्याच्या भक्तांमध्ये आहे. दुबईत इम्पोर्ट एक्स्पोर्टचा व स्क्रॅपचा व्यवसाय करणाऱ्या पुण्यातील या व्यावसायिकाने जमिनी खरेदी-विक्रीच्या व्यवसायातही चांगला जम बसवला होता. तर मुंबईत हॉटेल व्यवसायाची साखळी चालवणारा दुसरा भक्तही अशोक खरातला (Ashok Kharat) याच परिक्रमेत मिळाल्याची चर्चा आहे. याचाही जमीन खरेदी-विक्रीत बोलबाला होता. भक्तांकडून पैशाचा ओघ चांगला असताना हा पैसा कुठे ठेवायचा हा प्रश्न खरातलाही सतावत असावा. त्याचदरम्यान दोघांची झालेली भेट म्हणजे दुधात साखरच म्हणावी लागेल. या व्यवसायातील अनेक छक्के पंजे या दोघांनीच खरातला शिकवल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Ashok Kharat Case : मंत्रालयाजवळील पंचतारांकित हॉटेलमध्ये खोल्या कायमच्या बुक, ‘वर्षा’वर खास पूजेची चर्चा; खरातसाठी माजी मुख्यमंत्र्यांकडून विशेष खातीरदारी

नाशिक-सिन्नरच्या बाहेरही त्यांनीच खरातला कमाईचा नवा मार्ग दाखवला. शेतजमिनींपासून प्लॉटस्‌कडेही त्यांनीच वळवल्याची चर्चा आहे. काही व्यवहारांना दोघे भागीदारही होऊ लागले. काही नवे भागीदारही त्यांनी खरातला दिल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातले, अहिल्यानगरचे सनदी अधिकारी, आयपीएस अधिकारीही या व्यवसायात आधी खरातबरोबर होतेच. अनेक मंत्र्यांनाही जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय कमी जोखमीचा वाटत होता. देशातला पहिला सेझ सिन्नरला साकारत होता. त्यामुळे संपूर्ण देशातून येथे गुंतवणूक करण्यासाठी व्यावसायिक, व्यापारी, राजकारणी आले. अनेकांनी तर प्रत्यक्ष जागा न पाहताही सेझपासून पाच मिनिटांच्या अंतरावर यासारख्या भुलवणाऱ्या ऑनलाईन जाहिरातींना फसून प्लॉटस्, जमिनी खरेदी केल्या. त्यात लाखो रुपये गुंतवले. सिन्नरकडे खरेदीदारांच्या, गुंतवणूकदारांच्या रांगा लागल्या होत्या. पुढे हा सेझ फसल्यानंतर काही गुंतवणूकदार अडकले तरी सिन्नरला शेतजमिनीच्या विक्रीला सोन्याचे दिवस आले. खरातकडेही गुंतवणूक करणारे येऊ लागले. विश्वासाने पैसा गुंतवू लागले. इथल्या व्यवहारांमध्ये मिळणाऱ्या नफ्यांपेक्षा पुणे, मुंबईकडे मिळणारा नफा अफाट होता. मात्र, तिकडच्या जमिनी खरेदी करण्यात अनेक अडचणी होत्या. राजकारणातला कोणीतरी ‘आका’ खरातसह त्याच्या दोन्ही साथीदारांनाही हवा होता.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : पाप झाकण्यासाठी खरातचा नीच डाव! पीडितेची ढाल करत ऑफिसबॉयला बनवले ‘बळीचा बकरा’

पुढे समृद्धी महामार्गसारखे (Samruddhi Highway) सोन्याची अंडे देणारी कोंबडीच सिन्नरकडे चालत आली. या काळात समृद्धी महामार्गाच्या आजूबाजूच्या जागा खरेदी करण्याकडे गुंतवणूकदारांचा ओघ जादा होता. वर्षानुवर्षे राज्याचे नगरविकासमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंसारख्या मंत्र्यांशी खरातचे असलेले जवळचे संबंध मुंबई पुण्यातल्या अडचणीच्या जमिनींचे व्यवहार करण्यासाठी फायद्याचे ठरणार होते. त्यामुळे पुणे, मुंबईतले हे दोघेही व्यावसायिक खरातच्या अधिकच प्रेमात पडले. पुणे, मुंबईतील अनेक व्यावसायिक, उद्योजक यांनीच खरातच्या दरबारात आणले. खरात उभारत असलेले दुर्मिळ मंदिर पाहून हे नवे भक्तही खरातच्या प्रेमात पडत होते. खरातची मंदिराशेजारील शेतीही डोळे दीपावणारीच होती. या शेतीला लागणारे पाणी थेट नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या उजव्या तट कालव्याच्या शेजारी विहिरीसाठी जागा खरेदी करून खरातने मिटवला. एखाद्याने शेततळे खोदावे अशी प्रशस्त विहीर तेथे खरातने खोदली. मात्र, तेथून शेतीपर्यंत साडेचार कि.मी. पाईपलाईन करायची होती. तेवढ्या पाण्याने शेतीसह मंदिराचे भागणार नव्हते. त्यावेळी राज्य सरकार मदतीला धावून आले. शिवनिका संस्थानला थेट कालव्यातून पाणी उचलण्याची परवानगी देणारा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने घेतला. मात्र, ज्या मंत्र्याच्या उपसमितीने हा निर्णय घेतला, त्यांची नावे कोणालाच कळली नाही. अर्थात खरातांच्याच प्रेमात असलेल्या मंत्र्यांनीच हा निर्णय घेतला असणार. शेतीची आणि संस्थानची साडेचार कि.मी. लांबीची पाईपलाईन एकाच वेळी पूर्ण करून शेती आणि परिसरात एकाच वेळी पाणी आणण्याचा विक्रम खरातने केला.

हे देखील वाचा :  Ashok Kharat Crime News : पूजाविधीच्या नावाने उकळली खंडणी; खरातविरुद्ध आठ गुन्हे, पीडितांच्या सात फिर्यादी

मोठे उद्योग घराणेही प्रेमात

केवळ देश व राज्यातले राजकारणी, सनदी अधिकारीच खरातचे फॅन नव्हते. व्यावसायिक, कारखानदारही त्याच्या मागे-पुढे फिरायला लागले होते. त्याचा हा लौकिक ऐकून व्यावसायिक घराण्यांनाही त्याचे आकर्षण निर्माण झाल्याची चर्चा होती. जगभरात नाव असलेल्या एका उद्योगपतीचे पुत्र खरातला भेटण्यासाठी मुंबईच्या ‘त्या’ पंचतारांकित हॉटेलमध्ये गेल्याची चर्चा त्यावेळी खरातच्या भक्तांमध्ये होती. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्याच्या मध्यस्थीनेच ही भेट घडून आल्याची त्यावेळी चर्चा होती. आपल्या संपूर्ण लवाजम्यासह आलेल्या पुत्राने या हॉटेलच्या एका मजल्यावरील सर्व खोल्या तेव्हा बुक केल्याची चर्चा होती. खरात आणि त्याच्यात सुमारे अर्धा-पाऊण तास बंद दाराआड मीटिंग झाल्याची चर्चा होती. या भेटीने संतुष्ट झालेल्या या पुत्राने त्यावेळी शिवनिका संस्थानच्या नावाने २०-३० लाखांचा धनादेशही खरात याच्याकडे सोपवल्याची चर्चा होती.

हे देखील वाचा :  Ashok Kharat Crime : व्यवसायात नशीब आजमवणाऱ्या युवकाला भोंदू खरातने दिला होता सिन्नर सोडून जाण्याचा सल्ला; आता ‘तोच’ बनला नगरसेवक

ताज्या बातम्या

MLC Election : प्राजक्त तनपुरे बिनविरोध

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar उमेदवारी अर्ज माघारीवरून घेण्यात आलेला आक्षेप गैरसमजूतीतून घेण्यात आल्याबाबतचे लेखी पत्र अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिल्यानंतर भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे...