सिन्नर | प्रतिनिधी | Nashik
खरात गळाला लागलेल्या मोठ्या माशांना भेटायला वेळ द्यायचा. मात्र, सर्वसामान्य भक्तांना ते माहीत नसल्याने अशोक खरातच्या (Ashok kharat) कार्यालयात ते गर्दी करायचे. त्यांना बाहेर बसून राहिल्याशिवाय पर्याय नसायचा. सन २०१०-११ मधील ही घटना असावी. सिन्नरच्या (Sinnar) शिवाजी चौकात शेअर्स ट्रेडिंगमधील कम्युनिटी मार्केटचे ऑफिस एका युवकाने (Youth) उघडले होते. या व्यवसायातील अनेक चढउतारांमुळे या क्षेत्रात नवख्या असलेल्या युवकाला या व्यवसायात म्हणावा असा जम बसवता येत नव्हता. दररोज त्याच्याकडे येऊन बसणाऱ्या खरातच्या एका भक्ताने या युवकाला खरातला भेटण्याचा सल्ला दिला. या युवकाने बरेच दिवस त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, या भक्ताने फारच आग्रह केल्यामुळे तो एके दिवशी सकाळी सकाळी खरातच्या नाशिकच्या ऑफिसला गेला.
इंजिनियरिंगमधील पदवी घेतलेल्या या युवकाने आपली सर्व कहाणी खरातला सांगत व्यवसायात यशाचा मार्ग दाखवण्याची विनंती केली. टेबलवर नोटांनी भरलेल्या काचेच्या बाऊलमध्ये काही टाकावे लागते हे या युवकाला माहीतच नव्हते. काही मिनिटे तो तसाच उभा राहिला. खरातने त्याला अमुक तारखेला येऊन भेट असे सांगत जवळपास त्याला कटवलंच, हा युवक ठरलेल्या तारखेला खरातच्या कार्यालयात (Office) पोहोचला. प्रतीक्षा कक्षात चार पाच लोक बसले होते. मात्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष करत हा युवक थेट खरातसमोर जाऊन उभा राहिला, खरात शक्यतो एखाद्या व्हीआयपीची वाट पाहत असावा. या युवकाला पाहून खरात थोडासा चिडलाच. डायरेक्ट कसा आतमध्ये आलास असा त्याने प्रश्न करताच युवकाने तुम्हीच मला आज बोलावले याची आठवण करून दिली. तुझं काहीच होणार नाही, सिन्नर सोडून पळून जा, असा सल्ला खरातने दिल्यावर युवकाला आश्चर्य वाटले. मीका पळून जाऊ असा उलट प्रश्न त्याने करताच खरातचा पारा चढला.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : पाप झाकण्यासाठी खरातचा नीच डाव! पीडितेची ढाल करत ऑफिसबॉयला बनवले ‘बळीचा बकरा’
तुला काही अक्कल नाही, निघबाहेर असे त्याने म्हणताच युवकाचाही पारा चढला. माझी अक्कल काढू नका. मी इंजिनियरिंग मधला पदवीधर आहे. कुठेही दोन पैसे कमवेल. काहीही सल्ला देऊ नका, असे त्याने रागाच्या भरात सुनावताच बाहेरच्या पोराला खरातने आवाज देत ‘या युवकाला बाहेर काढण्याचा आदेश दिला. तो मुलगा युवकाला हाताने बाहेरच्या बाजूस ढकलू लागताच युवकाच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. ए ढकलायचे काम नाही. याला काय समजते, भामटा आहे हा. त्याच्या नादी लागू नका. तो काहीही सल्ला देतो, असं ओरडून सांगतच युवक बाहेर पडला. त्यामुळे संतापलेला खरात आपल्या जागेवरून उठून युवकाच्या मागे जवळपास धावलाच.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : पूजाविधीच्या नावाने उकळली खंडणी; खरातविरुद्ध आठ गुन्हे, पीडितांच्या सात फिर्यादी
मात्र, त्याचवेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा (MPSC Exam) उत्तीर्ण होऊन प्रशासनात उच्च पदावर पोहोचलेला एक साहित्य’कार’ कार्यालयात पोहोचल्याने खरातला आवरते घ्यावे लागल्याचे या युवकाचे म्हणणे आहे. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्यांपैकी काहींचे चेहरे कावरेबावरे झाले होते तर काहींनी तिथला राग रंग पाहून बाहेर पडणे पसंत केले. हा युवकही संतापातच बाहेर पडला. फार वर्ष हा युवक कम्युनिटी मार्केटच्या व्यवसायात टिकला नाही. नंतर अनेक व्यवसाय करता करता आता तर तो सिन्नरचा नगरसेवक बनला आहे. खरातच्या सल्ल्याप्रमाणे सारं सोडून तो खरच पळून गेला असता तर.
हे देखील वाचा : Ashok Kharat Case : खरातच्या अघोरी कृत्यांनी नाशिक हादरले; SIT तपासात अंगावर शहारे आणणारी माहिती समोर





