Thursday, October 29, 2026
Homeक्राईम​Crime News : दुबई-पाकिस्तान 'क्रिप्टो-टेरर' नेक्सस; गरजवंत भारतीय तरुणांना 'लो-कॉस्ट स्लीपर सेल'...

​Crime News : दुबई-पाकिस्तान ‘क्रिप्टो-टेरर’ नेक्सस; गरजवंत भारतीय तरुणांना ‘लो-कॉस्ट स्लीपर सेल’ बनवण्याचा गंभीर कट!

​

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

दुबईत बसलेला पाकिस्तानी (Pakistan) गँगस्टर शहजाद भट्टी आणि डोगर गँगच्या माध्यमातून भारतामध्ये चालवल्या जाणाऱ्या देशविघातक कारवायांमध्ये धक्कादायक पॅटर्न समोर आला आहे. आर्थिक विवंचनेत असलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना ‘लो-कॉस्ट स्लीपर सेल’ आणि ‘डिजिटल मर्सिनरीज’ (भाडोत्री अतिरेकी) म्हणून वापरण्याचा आंतरराष्ट्रीय सायबर कट असल्याचे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. 

भट्टी टेरर लिंकच्या तपासात नाशिक परिक्षेत्रातून २१ आणि राज्यातून ११२ संशयितांना महाराष्ट्र व नाशिक एटीएसने (Nashik ATS) ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. हे तरुण कोणत्याही दहशतवादी संघटनेचे सक्रिय सदस्य नसल्याचे पुढे आले असले तरी केवळ फेसबुक, टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवरील भडकाऊ रिल्सच्या आहारी जाऊन, २० ते ५० हजार रुपयांच्या किरकोळ आमिषासाठी ते देशद्रोहाच्या दलदलीत ओढले गेल्याचे असे समाेर आले आहे.

शहजाद भट्टी हा दुबईत (Dubai) बसून या डोगर गँग आणि इतर स्थानिक टोळ्यांच्या मदतीने आपले नेटवर्क चालवत आहे. तो आणि त्याचे इतर पाकिस्तानी हँडलर्स (आबिद जट, अजमल गूजर) या गँगचा वापर करून भारतात गुन्हेगारी आणि दहशतवादी कारवाया पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या दृष्टीने स्टेट व सेंट्रल इंटेलिजन्स, एटीएस, आयबी, राॅ, सीबीआय गांभीर्याने तपास करत आहे. 

​’टास्क’ची कार्यपद्धती

रेकी आणि व्हिडिओ मेकिंग : अहमदनगरमधील एका कार्यकर्त्याच्या घराची रेकी करून त्याचा व्हिडिओ पाकिस्तानातील सोशल मीडिया अकाउंटवरून प्रसिद्ध करणे हा कटाचा भाग होता. स्थानिक तरुणांना फक्त ‘छायाचित्र काढण्याचे’ किरकोळ काम सांगून घातपाताची पार्श्वभूमी तयार केली जात आहे.

ड्रोन आणि ड्रग्सची वाहतूक : पंजाब किंवा सीमावर्ती भागात पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे पडलेली बेकायदेशीर हत्यारे आणि ड्रग्सचा साठा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी शिकाऊ तरुणांचा ‘कुरिअर’ म्हणून वापर केला जात आहे.

लो-कॉस्ट टेररिझम (पेट्रोल बॉम्ब) : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने जप्त केलेले पेट्रोल बॉम्ब हे सिद्ध करतात की, महागड्या शस्त्रांऐवजी स्थानिक पातळीवर उपलब्ध साहित्यातून (पेट्रोल, बॉम्ब) मोठ्या शहरांत दहशत पसरवण्याचा हा नवा पॅटर्न आहे.

टार्गेट किलिंग आणि दंगलीचे कारस्थान : उत्तर प्रदेशच्या आजमगडमधील तरुणाला थेट एका महिला नेत्याच्या हत्येचा टास्क देण्यात आला होता, म्हणजे देशात जातीय दंगल भडकवता येईल.

मुद्दे

  • – ‘रॅडिकलायझेशन’चे टप्पे (कट्टरतावाद)
    – ​सोशल मीडियावरील संवेदनशील कमेंट्स आणि लाईक्सवरून आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा असंतुष्ट तरुणांचा शोध घेणे.
    – फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरून थेट टेलिग्राम किंवा ‘सिग्नल’ सारख्या इनक्रिप्टेड सुरक्षित ॲप्सवर चॅटिंग हलवणे.
    – सुरुवातीला गुगल पे किंवा क्रिप्टो करन्सीद्वारे खात्यात छोटे फंड जमा करून विश्वास संपादन करणे व नंतर जाळ्यात ओढणे.

नाशिक परिक्षेत्रात पकडलेले संशयित

शहर/जिल्हा – संशयित
अहिल्यानगर – ०९
नाशिक शहर व ग्रामीण – ०६
धुळे – ०२
मालेगाव – ०२
इतर ठिकाणे – ०२

ताज्या बातम्या

Pomegranate Rate : राहाता बाजार समितीत डाळिंबाला काय मिळतोय भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata गुरुवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला 205 रुपयांपर्यंत प्रतिकिलोला भाव मिळाला. गुरुवारी डाळिंबाच्या (Pomegranate) 2775 क्रेट्स ची आवक झाली....