Friday, October 2, 2026
Homeक्राईमCrime News : महाराष्ट्राच्या सरकारी पोर्टल्सवर आंतरराष्ट्रीय हॅकर्सचा डाका; लाखो नागरिकांचा डेटा...

Crime News : महाराष्ट्राच्या सरकारी पोर्टल्सवर आंतरराष्ट्रीय हॅकर्सचा डाका; लाखो नागरिकांचा डेटा डार्कवेबवर

महाडीबीटी आणि जमीन नोंदणीसह महत्त्वाच्या यंत्रणांचे पासवर्ड लीक

नाशिक | भारत पगारे | Nashik

राज्य शासनाच्या (State Government) डिजिटल प्रणालीवर आंतरराष्ट्रीय हॅकर्सनी ताबा मिळवल्याची धक्कादायक बाब एका गोपनीय तांत्रिक अहवालातून उघड झाली आहे. जागतिक स्तरावर धुमाकूळ घालणाऱ्या ‘फोर्टिब्लिड’ या सायबर (Cyber) मोहिमेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील (Maharashtra) जनकल्याणकारी पोर्टल्सना बसला आहे.

- Advertisement -

हॅकर्सनी सर्वसामान्यांचे अनुदान, शिष्यवृत्ती आणि जमिनीच्या नोंदींशी संबंधित लाखो युझरनेम व पासवर्ड (क्रिडेंशियल्स) चोरून थेट डार्कवेबवर लिलावाला काढले आहेत. जिथून थेट पैशांचे व्यवहार होतात किंवा महत्त्वाचे दाखले दिले जातात, अशा पोर्टल्सना हॅकर्सनी लक्ष्य केले आहे. महाडीबीटीवरील तब्बल १८ हजार ३९१ शेतकरी खात्यांबर झालेला हा हल्ला थेट अनुदानावर दरोडा (Raid) टाकण्यासाठी वापरला जाण्याची भीती सायबर तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जमीन नोंदणी (आयजीआर) पोर्टल्सवरील हॅकिंगमुळे सामान्यांच्या मालमत्तेचे डिजिटल रेकॉर्ड धोक्यात आले आहे.

सुरक्षेचा भोंगळ कारभार

तपासणी केलेल्या ११२ बाधित सरकारी कर्मचाऱ्यांच्या संगणकांपैकी ५२.६८ टक्के संगणकांवर कोणतेही अँटीव्हायरस नव्हते, तर ३६.६१ टक्के संगणकांवर केवळ मोफत सुरक्षा होती. अवघ्या १० टक्के संगणकांवर योग्य सुरक्षा यंत्रणा होती आणि ३१ टक्के कर्मचाऱ्यांचे पासवर्ड अत्यंत कमकुवत आढळले. या भीषण गंभीर प्रकारानंतर सायबर सुरक्षा यंत्रणा उचस्तरावर डागडुजीच्या कामाला लागल्या आहेत.

कोणत्या पोर्टल्सचा किती डेटा चोरीला?

महाडीबीटी : सर्वाधिक ७३,००४ खाती बाधित (अनुदान व शिष्यवृत्ती धोक्यात).
विद्यार्थी पोर्टल : २०,८०७ विद्यार्थ्यांचे लॉगिन लीक (शैक्षणिक नोंदींवर टांगती तलवार).
इ-फिलिंग आयजीआर : २०,४२७ युझर क्रिडेंशियल्स हॅक (जमिनीच्या दस्तऐवजांत फेरफाराची शक्यता).
बार्टी पोर्टल : १७,४४६ खाती बाधित (जात पडताळणी डेटा धोक्यात).
इतर : पंचायत निवडणूक पोर्टल (३,२७५) आणि महाराष्ट्र पोलीस नागरिक पोर्टल (५१०).

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी एकाच दिवशी 92 उमेदवारांचे 100 अर्ज दाखल!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, गुरुवारी एकाच दिवशी 92 उमेदवारांनी 100 उमेदवारी अर्ज दाखल केले....