कनाशी | वार्ताहर | Kanashi
कनाशी बाजारपेठ परिसरात (Kanashi Market) तरुणावर प्राणघातक हल्ला (Attack) झाल्याची घटना (दि.२४) मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी अभोणा पोलिस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी सोमनाथ यशवंत गुंबाडे (रा. मोर्चोंडा, ता. सुरगाणा) याला आपला चुलत साडू संदीप अशोक बर्डे (रा. कनाशी, ता. कळवण) याच्यावर आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याचाच राग मनात ठेवून, सोमनाथ याने मंगळवारी सकाळी संदीपवर आपल्याजवळील धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्ल्यात संदीप यांला गंभीर दुखापत झाली असून त्यावर रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू आहेत. संदीप बर्डे याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून संशयित आरोपी सोमनाथ गुंबाडे विरुद्ध फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणी रमेश देवराम पवार (रा. कनाशी, ता. कळवण) यांनी अभोणा पोलिस ठाण्यात (Abhona Police Station) फिर्याद दिली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अभोणा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांनी घटनास्थळी भेट दिली. संशयित आरोपीस अटक (Arrested) करण्यात आली असून गुन्ह्याचा तपास अभोणा पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय चौरे करीत आहेत.




